*कोरोना योद्धा करिता “फ्रंट लाईन अप्शन” ची मुदत वाढवून देण्याची गडचांदूर भाजपाची मागणी*
*कोरोनाचा प्राथमिक प्रादुर्भाव ग्रामीण भागात रोखण्यासाठी मागणी*
कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना – चंद्रपूर – गडचांदूर सर्वी कडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासना पुढे मोठे आव्हान उभे झाले आहे.शासन स्तरावरून सर्वी कडे कोरोना लसीकरण केंद्र उभारले असून सर्वं प्रथम 55 वर्षां पुढील नागरिकांना व कोरोना योद्धा जसे पोलीस, डाँक्टर, नर्स,सफाई कामगार,शिक्षक इत्यादी कोरोना योद्धा करिता ऑनलाइन मध्ये “फ्रंट लाईन अप्शन” होते. व तेव्हा कोरोना योद्धा ना कुठलीही वयाची मर्यादा नव्हती.त्यावेळेस बरेचशे कोरोना योद्धने लसीचा लाभ घेतला.व आता 45 वर्षा वरील व्यक्तींना कोरोना लसीकरण देण्यात येत आहे.परन्तु पूर्वी काही 45 वयोगटातील कोरोना योद्धानी लसीकरण घेतले नाही.आता घेण्याकरीता गेले असता तेव्हा ऑनलाइन मध्ये “फ्रंट लाईन अप्शन” बंद केले असल्याने त्या कोरोना योद्धाना लसी पासून वंचीत राहावे लागत आहे.व आता परत कोरोनाने डोके वर काढल्याने परत या कोरोना योद्धाला आपल्या जीवाची पर्वा नकरता रात्रन दिवस काम करावे लागत आहे.तेव्हा या योद्धा करिता ” फ्रंट लाईन अप्शन” ची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी गडचांदूर भाजपा कडून कोरपना तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन केली आहे.यावेळी गडचांदूर शहर भाजपा अध्यक्ष सतीश उपलेंचिवार,जिल्हा सदस्य तथा माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष कोरपना मा संजयभाऊ मुसळे,भाजपा नेते निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,माहेशजी घरोटे आदी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज