*हिंगणघाट कोरोनाचा हॉट स्पॉट होण्या आधी सावरा*
*भारत देश कोरोनाचा हॉटस्पॉट झाला ; जगात सगळ्यात जास्त रुग्णसंख्या भारताची झाली आहे*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
वर्धा – महाराष्ट्र आरोग्य व्यवस्थेत जवळपास संपला.
औषधी, ऑक्सिजन जवळपास संपला आहे.
ही सगळी परिस्थिती आपण सगळे पाहतो आहे।
शासनाने लॉक डाऊन जाहीर केला पण हिंगणघाट नेहमीप्रमाणे सुरू होते.
सकाळी फिरायला जाणारे, दिवसभर आवश्यक काहीही नसताना फिरणारे आणि सायंकाळी परत फिरायला निघणारे कोविड दूत मास्क न घालता, काही मास्क दाढीवर ठेऊन बिनधास्त फिरत असलेले दिसले.
आता जर आपण मनावर घेतले नाही तर प्रत्येक घर बाधित होणार हे नक्की.
हिंगणघाट आणि जिल्ह्यात कुठेही बेड शिल्लक नाही.
कोरोना नाही असे म्हणणारे कितीही असले तरी आपण आपली तब्येत जपा.
शासन आणि स्थानिक प्रशासन त्यांचे काम करेल पण आता आपण एक काम करू शकतो.
आपल्या ओळखीच्या कमीत कमीत 50 लोकांना फोन करून घरी थांबायला सांगा.
हा कोरोना एका मिनिटात बाधित करतो आणि दहा मिनिटात पूर्ण कुटुंब बाधित होते.
आता हिंगणघाट तालुक्यातील रुग्णसंख्या दररोज 70 ते 100 दरम्यान निघत आहे या स्थितीला आपण सावरू शकतो नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाणार हे नक्की.
शहरातील सगळ्या सामाजिक संस्थांना विनंती आहे की आपण लोकांना घरी थांबण्याचे आवाहन सामाजिक माध्यमातून करू शकतो.
Maharashtra News Media सच की आवाज