*कन्हान परिसरात ६७ रुग्ण कोरोना पाॅजिटिव्ह*

*विना कामाने घरा बाहेर पडु नका – नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व कन्हान पोलीस परि.पो.उप.कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचे नागरिकांना आव्हान*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन शनिवार ला ६७ रुग्ण आढळुन आल्याने नगर परिषद चे मुख्याधिकारी व कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांनी नागरिकांना विना कारण घरा बाहेर पडु नये तसेच मास्क , सेनिटाइजर , सोशल डिस्टेन्स व राज्य शासनाच्या नियमाचे पालन करून आपल्या परिवाराची काळजी घ्या असे कडकडीचे आव्हाहन केले आहे .
कन्हान – पिपरी नगर परिषद च्या नवीन इमारत मध्ये शनिवार ला नागरिकांची रॅपेट टेस्ट व आर टी पीसीआर टेस्ट करण्यात आले असुन शनिवार दिनांक १७ एप्रिल ला कन्हान परिसरात एकुण ६७ रुग्ण आढळुन आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन कन्हान – पिपरी नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांनी नागरिकांना घरा बाहेर विना कारण पडु नका , मास्क , सेनिटाइजर सोशल डिस्टेन्स चे पालन करा व राज्य शासनाच्या नियमाचे पालन करा असे कडकडीचे आव्हाहन केले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज