Breaking News

*कन्हान पोलीसांनी अवैध जनावरांची गाडी पकडली* *कारवाई दरम्यान ११ गोंवशाला जीवनदान देऊन एकुण ७,६५,००० रुपयाचा मुद्देमाल केला जप्त*

*कन्हान पोलीसांनी अवैध जनावरांची गाडी पकडली*

 

*कारवाई दरम्यान ११ गोंवशाला जीवनदान देऊन एकुण ७,६५,००० रुपयाचा मुद्देमाल केला जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी सिंगोरी च्या तारसा फाट्यावर रविवार च्या रात्री कन्हान पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून लगेच नाकाबंदी करुन ११ गोंवशाला जीवनदान देऊन तसेच वाहनासह एकुण ७,६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन फिर्यादी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस शिपाई संजय भदोरिया बक्कन नंबर २१५६ वय ३० वर्ष यांचा तक्रारी वरुन फरार आरोपी चालक विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .

कन्हान पोलीसांकडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक १८ एप्रिल २०२१ ला रात्री १२:३० ते १:३० वाजता च्या सुमारास कन्हान पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून बोरी सिंगोरी च्या तारसा फाट्यावर नाकाबंदी करुन यातील वाहन क्रमाक २७ – बी.एक्स – ३४५७ ला थांबविले असता वाहना मध्ये ११ गोवंशाचे चार ही पाय व तोंड दोरीने बांधुन त्यांना क्लेशदायक वागणुक देऊन व त्यांचासाठी कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता वाहना मध्ये कोंबुन त्यांना कत्तल करण्याकरिता घेवुन जातांना मिळुन आल्याने सदर वाहन चालक आपले वाहन घटनास्थळी सोडुन फरार झाला असुन कन्हान पोलीसांनी सदर वाहन व यामध्ये असलेले ११ गोवंश असा एकुण किंमत ७,६५,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन फिर्यादी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस शिपाई संजय भदोरिया बक्कन नंबर २१५६ वय ३० वर्ष यांचा तक्रारी वरुन फरार आरोपी चालक विरुद्ध अपराध क्रमांक ११४/२०२१ कलम ४२९ भादंवि , सहकलम ११(१) , (अ) , (ड) , (ई) , (फ) , प्रा.छ.पु अधिनियम कायदा सहकलम ५ (अ) (ब) प.स अधिनियम कायदा सहकलम १८४ मोवाका तहत गुन्हा दाखल करुन ही कारवाई करण्यात आली आहे .

सदर कारवाई नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला , उपाधिक्षक श्री राहुल माकणीकर , उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान मुख्तार बागवान , यांचा मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार श्री सुजितकुमार क्षीरसागर , पोहवा जयलाल सहारे , नापोशि कृणाल पारधी , राहुल रंगारी , पोशि संजय भदोरिया , सुधिर चव्हान , शरद गिते , मुकेश वाघाडे , सतीश तांदळे , निसार शेख , जितेंन्द्र गावंढे , सह आदि ने ही कारवाई केली आहे .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …