Breaking News

*जुगार अड्यावर धाड़ 3 लक्ष 15 हजाराचख ऐवज जप्त* *सावनेर पोलिसांची कारवाई*

*जुगार अड्यावर धाड़ 3 लक्ष 15 हजाराचख ऐवज जप्त*

*सावनेर पोलिसांची कारवाई*

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – दि. 19/04/2021 रोजी मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अशोक सरंबळकर सर आणि पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन सावनेर, मारुती मुळूक सर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर कारंडे, पोलीस हवालदार पांडे /77, पोलीस कॉन्स्टेबल गाडगे/1426, इंगोले/1789 यांनी पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील सावंगी शेत शिवारात चालू असलेल्या 52 तासपत्त्याचे जुगारा वर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रेड केली असता, कार्यवाही दरम्यान घटनास्थळा वरून एकूण 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे अंगझडती मध्ये मिळालेले नगदी 5500/- रुपये जप्त करण्यात आले. तसेच, घटनास्थळा वरील एकूण 9मोटर सायकल / मोपेड किं. अं. 3, 10, 000/- रुपये च्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, 52 तासपत्ते किं. अं. 50/- रुपये चे जप्त करण्यात आले. असा एकूण 3, 15, 550/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपी नावे पुढील प्रमाणे प्रफुल्ल ताजने, रा. नांदोरी,हेमराज तिबोले, रा. पहलेपार,भुवन बनारसी, पहलेपार,विजय डाखोळे, सावनेर,प्रवीण भोंडवे, सावनेर तर फरार आरोपी विनोद गुरारीकर, सावनेर,आकाश टिक्कम, सावनेर,प्रतीक खोरगडे, सावनेर,अप्पा माने, तेलगाव,मनोज पिंगे, नांदोरी ,नितीन सहारे, खानगाव तसेच इतर चार आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर येथे अप. क्र. 203/21, कलम – 12 मजुका अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …