Breaking News

*अनिल अनिल देशमुख यांनी घेतला आपल्या मतदार संघातिल कोरोना विषाणु संसर्गाच्या दुसर्या लाटेच्या परिस्थितीचा आढावा* *कायदा व सुव्यवस्थेवरही चर्चा* *सुपरस्पेडिंग कोव्हिड १९च्या नियमावली चे सर्वांनीच पालन करावे (माजी मंत्री) आमदार अनिल देशमुखांचे आवाहन*

*अनिल अनिल देशमुख यांनी घेतला आपल्या मतदार संघातिल कोरोना विषाणु संसर्गाच्या दुसर्या लाटेच्या परिस्थितीचा आढावा*


*कायदा व सुव्यवस्थेवरही चर्चा*

*सुपरस्पेडिंग कोव्हिड १९च्या नियमावली चे सर्वांनीच पालन करावे (माजी मंत्री) आमदार अनिल देशमुखांचे आवाहन*

काटोल प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे

काटोल – राज्याचे माजी गृहमंत्री व काटोल विधानसभा मतदार संघा चे आमदार अनिल देशमुख यांनी आपल्या मतदार संघातील काटोल तालुक्यातील कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या दुसर्या लाटेच्या सुपरस्पेडिंग अनुषंगाणे उद्भवलेली परिस्थिति आणि कायदा सुव्यवस्था संबंधी काटोल तालुक्यातील परिस्थितीची माहिती घेण्याकरीता काटोल उपविभागीय व आपत्ती व्यवस्थापन विभागा चे सभागृहात शारिरीक दुरी,( सोशल डिस्टंससींग) चे पालन करत २०एप्रील चे सकाळी १०-३०वाजता बैठकिचे आयोजन करन्यात आले ।


या प्रसंगी काटोल उपविभाग आपत्ति व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्रीकांत उंम्बरकर यांनी विभागीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी रविन्द्र ठाकरे यांचे समक्ष काटोल विधान सभा मतदार संघातील काटोल तालुक्यातील कोव्हिड१९ संसर्गित रूग्णांची माहिती देतांना सांगितले की काटोल तालुक्यात कोरोना विषाणूजन्य आजाराचे माहे मार्च २०२०ते१९एप्रील २०२१ पर्यंत ( ६९८३ रूगण)आढळून आले.(२१९३)रूग्ण उपचार घेत आहेत, तर (४७०२)रूग्ण बरे झालेले आसुन या पैकी(८८)कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे। सध्या(५०)संक्रमित काटोल येथील कोविड केअर सेंटर ला उपचार घेत आहेत, (२१३५)संक्रमित (होमआयसोलेसन) गृहविलगीकरणात असुन ०८संक्रमित नागपुर ला इलाज घेत असल्याची माहीती दिली.सोबतच कोविड १९ प्रतिबंधात्म लसीकरनाची माहीती देतांना सांगितले की काटोल तालुक्याची लोकसंख्या १६३३८४असुन ४५वर्ष व त्यापेक्षा ज्यास्त वयोगटाची संख्या30टक्के म्हणजे 49015 इतकी आहे,या पैकी 19एप्रील २०२१पर्यंत 34657लाभार्थींनी लाभ घेतलेला आहे, बाकी असलेले 14358लाभार्थींनां जनजागृति करून लसीकरनासाठी प्रोत्साहित केले जाईल. काटोल तालुक्यातील डोरली भांडवलकर या गावात 100टक्केतर धुरखेडा या गांधी 98टक्के लसीकरण झाल्याची माहीती आपत्ती व्यवस्थापन उप विभागीय आपत्ती व्यवस्थापन विभाग के अध्यक्ष श्रीकांत ऊंबरकर व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे इंडिकेटड आॅफिसर निलेश कदम यांनी या प्रसंगी दिली .
या प्रसंगी माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी काटोल तालुक्यातील कोव्हिड १९च्या परिस्थितीला गांभीर्यांने घेण्याबाबद अनेक मार्गदर्शक सुचना दिल्या। तसेच नागरिकांनी सुद्धा सुपरस्पेडिंग कोविड १९ ला रोखण्या नागरिकांनी कोविड १९च्या नियमावली चे काटेकोरपणे पालन करून स्वताः व कुटूंबीयांना सुरक्षित ठेवू शकता, या करिता शासन व प्रशासनाला सहकार्य करन्याचे आवाहन ही या प्रसंगी अनिल देशमुख यांनी केले । या प्रसंगी काटोल पंचायत समीती चे उपसभापति अनुराधा खराडे यांनी तालुक्यातील स्वास्थ्य धान्य दुकानांचेअनेक दुकानदारांची प्रकृती बरी नाही तर अनेक जन कोवीड बाधीत झाले या मुळे ग्रामीण भागात स्वःत धान्य वितरणावर परिनाम होत आहे, या करीता कोविड महामारी संपे पर्यंत लाभार्थिंचे पाॅश मशिन वर आंगठा लावण्या ऐवजी संबधीत दुकानदारांना नाॅमिनी चे आदेश काढल्यास यातून काही मार्ग निघू शकेल अशी मागणी या आढावा बैठकीत करन्यात आली । यावर माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे असे सुचविले ।
या प्रसंगी काटोल नगरपालिका- नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, काटोल पंचायत समीती चे उप सभापति अनुराधा खराडे, माजी नगराध्यक्ष राहूल देशमुख कृ उ बा स सभापति बाबा शेळके, जि प सदस्य चंद्रशेखर कोल्हे, समीर उमप, चंद्रशेखर चिखले, संदिप वंजारी, जिल्हाधिकारी रविन्द्र ठाकरे, पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच , अनूप खराडे, पं स सदस्य संजय ,सौ निलीमा ठाकरे, , उप विभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, प्र तहसीलदार निलेश कदम, बी डीओ संजय पाटील , वैद्यकिय अधिक्षक डाक्टर दिनेश डावरे,तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यव्हारे , ठाणेदार महादेव आचरेकर, संबधीत विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते ।
या प्रसंगी कोरोना संसर्गापासून बचावात्मक उपाय व त्याची अंबलबजानी बाबद अनिल देशमुख यांनी उपस्थीतांशी चर्चे दरम्यान त्याचे मत जाणून घेतली व जन सहयोगात्मक अपील केली करन्यात आली ।


*कोव्हिड १९चे नियम दिशा निर्देशानुसार सर्वांनी सहकार्य करावे, पोलीस व राजस्व प्रशासनाला ब्रेक द चेन कोव्हिड १९च्या दिशा निर्देशचे पालन करावे या बाबद जनजागृति करावी अश्या सुचना ही दिल्या. 

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …