Breaking News

*मोठी बातमी* *कन्हान शहरात व परिसरात सर्व व्यापारांच्या स्वईच्छेने सात दिवसाचा कडक लाॅकडाऊन* *कन्हान-पिपरी नगरपरिषद येथील बैठकीत व्यापारी, दुकानदारांच्या सहमतीने निर्णय.* *कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघाच्या स्व: ईच्छा लॉकडाऊन ला नागरिकांनी सहकार्य करावे.* *कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासनाचे व कन्हान पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आव्हान*

*मोठी बातमी*

*कन्हान शहरात व परिसरात सर्व व्यापारांच्या स्वईच्छेने सात दिवसाचा कडक लाॅकडाऊन*

*कन्हान-पिपरी नगरपरिषद येथील बैठकीत व्यापारी, दुकानदारांच्या सहमतीने निर्णय.*

*कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघाच्या स्व: ईच्छा लॉकडाऊन ला नागरिकांनी सहकार्य करावे.*

*कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासनाचे व कन्हान पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आव्हान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन किती तरी लोकांचा बळी जात असल्यामुळे परिसरातल्या नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघा द्वारे कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे बैठक घेऊन वैद्यकीय सेवा व दुध डेअरीचे दुकानें सोडुन सर्व व्यापारी दुकानदारांच्या सहमतीने कन्हान परिसरात स्वईच्छेने सोमवार ते रविवार असे सात दिवस पुर्ण पणे कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला असुन सर्व नागरिकांनी , कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघाला , नगर परिषद प्रशासनाला व कन्हान पोलीस प्रशासनाला सहकार्य करित स्व:ईच्छा कन्हान लॉकडाऊन यशस्विरित्या पार पाडुन कोरोना महामारीस हद्दपार करावे. असे आव्हाहन स्थानिक प्रशासना कडुन करण्यात आले आहे.


कन्हान शहरात व परिसरात कोरोना रूग्णांची संख्या वाढु लागल्याने आणि मुत्यु दर सुध्दा वाढु लागल्याने नागरिकांच्या हितार्थ कोरोना विषाणु महामारी रोखण्याकरिता कोरोना साखळी तोडुन कोरोना हद्दपार करण्यास कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाने कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे गुरुवार दिनांक २२) एप्रिल ला कोरोना च्या पार्श्वभुमिवर घेण्यात आलेल्या बैठकीत कन्हान परिसरात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत वैद्यकीय सेवा व दुध डेअरीचे दुकानें सोडुन सर्व व्यापारी दुकानदारांच्या स्व: ईच्छेने कन्हान परिसरात सोमवार दिनांक २६ एप्रिल ते रविवार २ मे पर्यंत असे सात दिवस पुर्ण पणे कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असुन सर्व नागरिकांनी शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस जिवनावश्यक वस्तुची खरेदी करून घेऊन या सात दिवसाचा कडक लाॅकडाऊन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करून कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघाला, कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासनाला व कन्हान पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.तसेच विनाकारण घरा बाहेर पडु नये, मास्क, सेनिटाइजर व सोशल डिस्टेन्स चे पालन करित ४५ वर्षा वरिल सर्व नागरिकांनी लसीकरण करून कोरोना महामारी हद्दपार करण्यास सहकार्य करावे. अन्यथा आदेशाचे पालन न करणा-या नागरिकांवर व आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ आणि भारतीय दंड संहिताचे कलम१८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कार वाई करण्यात येईल असे कडकडीचे आव्हाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व कन्हान पोलीस निरिक्षक गुन्हे शाखा संदीप कदम यांनी केले आहे.

याप्रसंगी कांन्द्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोले , कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघ अध्यक्ष अकरम कुरैशी , सचिव प्रशांत बाजीराव मसार , सचिन गजभिये , चंद्रशेखर कळमकर , संजय खोब्रागडे , राम तदाणी , प्रदीप गायकवाड , मोटवाणी , बापु चकोले , अशोक मोरपाना , सुनिल बारईकर , चिंदु मालाधरे , नितीन मेश्राम , बाबु भाई , इस्राईल भाई , संजय गंगवाणी आदि व्यापारी दुकानदार उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …