Breaking News

*कोरोना लसी प्रति जनजागृती करा- सुनील केदार* *जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिल्या भेटी*

*कोरोना लसी प्रति जनजागृती करा- सुनील केदार*


*जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिल्या भेटी*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

नागपुर – कोरोना या जागतिक महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळाख्यात घेतलेले आहे. संपूर्ण जग या महामारी मुळे त्राही त्राही झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना करूनच आपण या रोगाचा नायनाट करू शकतो. म्हणून कोरोना लसीकरणाचा व्यापक प्रचार व प्रसार करून जनजागृती करावी असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. या कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्याकरिता मंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील सालई- गोधणी, तरोडी बु., भुगाव, धनला व भिष्णुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी दिल्या.
यावेळी प्रमुख रूपाने नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, सभापती तापेश्वर वैद्य, अवंतिका लेकुरवाळे, मेघा मानकर, समीर उमप, जिल्हा आरोग्य अधिकारी सेलोकर उपस्थित होते.
यावेळी मंत्री सुनील केदार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परमेडिकल टीम, सफाई कामगार यांच्याशी संवाद साधला. आरोग्य केंद्रातील मनुष्यबळ, सुविधा या बाबतीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मंत्री सुनील केदार यांनी निर्देश दिले.
आज या कोरोना काळात सर्व प्रशासनिक अधिकारी व कर्मचारी कार्य करीत आहे. त्यांचा या कार्याला प्रोत्साहन देणे करीता व त्यांच्याशी चर्चा करणे करिता व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणेकरिता मी इथपर्यंत आलो असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …