*गडचिरोली येथे १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी दिली मंजुरी*
*आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश ; मंजुरी दिल्याबद्दल पालकमत्र्यांचे केले अभिनंदन*
*IMA, GAMP व नगर परिषद गडचिरोली च्या पुढाकाराने होणाऱ्या १०० बेडच्या सेंटर ला मंजुरी*
*कोविड सेंटर लवकरात लवकर उभारण्यासाठी आमदार डॉ देवरावजी होळी यांची धडपड यशस्वी होणार*
गडचिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर
गडचिरोली – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व कोरोनाचा प्रकोप बघता जिल्हा केंद्रांवर IMA, GAMP व नगर परिषद गडचिरोली च्या पुढाकाराने १०० बेडचे कोविड उपचार केंद्र उभरण्यासंदर्भात आमदार डॉ देवराव जी होळी यांनी जिल्हयाचे पालकमंत्री ना एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. पालकमंत्री महोदयांनी तातडीने मंजुरी देत लवकरात लवकर प्रक्रिया पुर्ण करा शासनही सहकार्य करेल असे आश्वासन दिले. मा.आमदार डॉ देवरावजी होळी व वैद्यकिय प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी पालकमंत्री यांची भेट घेऊन सदर मागणी केली होती मागणी मंजुर झाल्याने आता गडचिरोलीत लवकरच १०० बेडचे कोरोना सेंटर उभे होणार असल्याची माहिती देत आमदार डॉ देवरावजी होळी मंजुरी दिल्याबद्दल पालकमत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज