*पिपळा येथे वृक्ष लावुन सर्व समर्थ फाउंडेशन ची स्थापना*
*सर्व समर्थ फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष पदावर अभिषेक एकुनकर तर संस्थापक उपाध्यक्ष पदावर नितेश दुधके यांची नियुक्ती*

*तर सर्व समर्थ फाउंडेशन च्या अध्यक्ष पदावर प्रणिल कडू यांची नियुक्ती तर सचिव पदावर फिरोज दुधुके यांची नियुक्ती*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवनी – पारशिवनी तालुक्यातील पिपळा या गावात काही नवीन सौंदर्यीकरण करण्याकरिता सुशिक्षित युवकांनी वृक्ष लावुन सर्व समर्थ फाउंडेशन ची स्थापना केली असुन गावातल्या नागरिकांनी या फाउंडेशन ला सहकार्य करावे अशी विनंती सर्व समर्थ फाउंडेशन च्या पदाधिकार्यांनी नागरिकांना केली आहे .
पिपळा येथे शनिवार दिनांक.२४ एप्रिल २०२१ ला सुशिक्षित युवकांनी सर्व समर्थ फाउंडेशन या नावाने एक नवीन फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली असुन या फाउंडेशना मार्फत पिपळा या गावाच्या विकासात काय नवीन करता येईल त्याकरीता पिपळा गावात सर्व समर्थ फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली आहे . यावेळी सर्व समर्थ फाउंडेशन च्या पदाधिकार्यांनी म्हटले कि आपल्या भारत देशाकडे शंभर वर्षांपूर्वी भरपूर संपत्ती होती . परंतु आज काही वर्षांपूर्वी औद्योगिकीकरण आणि शहरीकरण वाढल्यामुळे झाडांचे प्रमाण नष्ट होत चालले असुन व मानव वृक्षांची तोड करून इमारती बांधण्यासाठी तसेच कारखाने वाढवून सिमेंटचे जंगल उभे करत असुन जंगल तोड होत असल्यामुळे जंगलांचा नाश होत आहे. तसेच जमीन खराब होत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत – जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. नुसती झाडे लावून फायदा नाही तर त्यांचे जतन केले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे व गावा मध्ये वृक्षलावून गावची शोभा वाढवली पाहिजे .

त्या अनुषंगाने सर्व समर्थ फाउंडेशन च्या पदाधिकार्यांनी पिपळा गावात वृक्ष लावुन सर्व समर्थ फाउंडेशन ची स्थापना करुन सर्व समर्थ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अभिषेक एकुनकर व संस्थापक उपाध्यक्ष नितेश दुधुके यांनी सर्व समर्थ फाउंडेशन च्या अध्यक्ष पदावर प्रणिल कडू , उपाध्यक्ष पदावर विष्णू वानखेडे , सचिव पदावर फिरोज दुधुके , व उपसचिव पदावर साहिल घोंगडे यांची नियुक्ती करण्यात आली असुन सदस्य या पदावर राकेश दुधुके , रोहित घोंगडे , आकाश मेश्राम , सागर शिवारे , शयाम मेश्राम , अंकुश दुधुके , लोकेश शिवारे , सुमित घोंगडे , निकेश शिवारे , नंदकिशोर एकूनकर , प्रफुल शिवारे , आर्यन घरडे , सुनील खंडाते , राहुल दुधुके , विशाल बावणे , अनिल भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . या प्रसंगी सर्व समर्थ फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी संस्थापक अध्यक्ष अभिषेक एकुनकर , संस्थापक उपाध्यक्ष नितेश दुधुके , सर्व समर्थ फाउंडेशन चे अध्यक्ष प्रणिल कडू , उपाध्यक्ष विष्णू वानखेडे , सचिव फिरोज दुधुके , व उपसचिव साहिल घोंगडे यांना पुष्प गुच्छ देऊन पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .
Maharashtra News Media सच की आवाज