Breaking News

*सावनेर तालुक्यातील खुरजगाव येथील जीटीएन इंडस्ट्रीज मध्ये कोरोना लसीकरण शिबीर संपन्न झाले* *45 वयोवर्षावरीर कामगारांनी घेतला लसीकरणाचा लाभ*

*सावनेर तालुक्यातील खुरजगाव येथील जीटीएन इंडस्ट्रीज मध्ये कोरोना लसीकरण शिबीर संपन्न झाले*

*45 वयोवर्षावरीर कामगारांनी घेतला लसीकरणाचा लाभ*

 

मुख्य प्रतिनिधि – किशोर ढूंढेले

सावनेर – ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच गावागावात लसीकरण मोहीम राबविल्या जात आहे त्यासाठी शासनाने कोरोना लस उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु आशेचे किरण म्हणुन बघितल्या जात असलेल्या लसीकरण विषयी अद्यापही काही गैरसमज असल्याने आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रनेच्या वतीने नागरीकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळविण्यासाठी घरोघरी जनजागृती केली जात आहे याच पार्श्वभुमीवर सावनेर तालुक्याच्या खुरजगाव येथील जीटीएन इंडस्ट्रीज लिमीटेड या कंपनीतील कामगारांचे लसीकरण करण्यासाठी येथील कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय बसवार आणि संघटनेचे पदाधिकारी यांचा पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र केळवद यांच्यावतीने जीटीएन इंडस्ट्रीजच्या गुरूकुल केंद्रात दिनांक 23/04/2021 रोजी लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यासोबतच कोरोनापासुन कंपनीतील कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य यासाठी व्यवस्थापन व कामगारांतर्फे आरोग्य विभागाचा गाईडलाइनचे पालन करून सर्व कामगारांचे लसीकरण करण्यात आले . कामगारांसाठी घेण्यात आलेल्या लसीकरण शिबीराला कामगार व ईतर कर्मचा – यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला . यासाठी कामगार संघटना , आरोग्य विभाग तसेच शासनाने केलेल्या सहकार्यासाठी जीटीएन इंडस्ट्रीजचे वरीष्ठ उपाध्यक्ष एच . के . मिटकर , सी डी टाकलखेडे , एच . आर . प्रबंधक सुरेन्द्र महंत , रवींद्र कुथे , ललित बभुरे , आर वी यादव , चंद्रप्रकाश कापसे , मयुर ठाकरे आदिंचे आभार प्रकट केले आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …