Breaking News

*केळवद पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिलीप ठाकूर यांचा आगळावेगळा प्रयोग* *चक्क मधुर गाण्याच्या स्वरात नागरिकांना “गाव वाले घराच्या बाहेर पडू नका ची विनंती*

*केळवद पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिलीप ठाकूर यांचा आगळावेगळा प्रयोग*

 

*चक्क मधुर गाण्याच्या स्वरात नागरिकांना “गाव वाले घराच्या बाहेर पडू नका ची विनंती*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः तालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन हे महाराष्ट्र व मध्यप्रदेश या सीमेवरील नागपुर जिल्ह्यातील टोकाचे पोलीस स्टेशन असुन सदर पोलीस स्टेशनमध्ये अधिकतर भाग ग्रामीण असुन काही मोजक्याच मोठ्या गावांचा समावेश असुन शेतकरी,शेतमजूर तसेच रोजंदारीवर वर काम करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.अश्यात लोकांना कोणत्याही गोष्टी रुजविण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतात असाच काही प्रकार केळवदचे ठानेदार दिलीप ठाकूर यांनी अमलात आनुन नागरिकांची मने जिंकली आहे.

वाढत्या कोरोना मुळे सर्वत्र लाँकडाऊन लावण्यात आले असले तरी लोकं रस्त्यावर गर्दी करत आहेत.आधिच कोरोना लाँकडाऊन मुळे आर्थीक कचाट्यात सापडेलेल्या नागरिकांना दंडात्मक कारवाईस पुढे जावे लागत आहे अश्यात ठानेदार हे आपल्या कार्यालयीन वाहनांच्या लाऊडस्पीकर वर गावा गावातील चौक व मुख्य रस्त्यावर “गाव वाले घराच्या बाहेर पडू नका” असे कर्णप्रीय गीत गावून गावकऱ्यांना विनंती करत आहे गावकऱ्यांनी या विनंतीला मान देण्यासाठी घराबाहेर न निघण्याचे विचारही बोलून दाखवली तर विनंतीला मान न देता नागरिक रस्त्यावर आढळल्याह त्यांना दंडात्मक कारवाईस पुढे जावे लागेल असा ईशारा ही याप्रसंगी दिला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …