*कन्हान, साटक केंन्द्रा व्दारे ८३६४ नागरिकांना लसीकरणा चा लाभ*
*प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान पहिला डोज ६१६९ व साटक २१९५ असे ८३६४ लसीकरण.*
*दुसरा डोज प्राथमिक आरोग्य. केंन्द्र कन्हान ६३७ व साटक ७१ असे ७०८ एकुण ९०७२ लसीकरण.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र द्वारे ४५ वर्ष व वरील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे ६ केंन्द्रात पहिला डोज ६१६९ साटक द्वारे ४ केंन्द्रात २१९५ असे ८३६४ तर दुसरा डोज कन्हान ६३७ व साटक ७१ एकुण ७०८ असे कन्हान व साटक केंन्द्रा द्वारे एकुण ९०७२ कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. दिनांक ५ मार्च पासुन आतापर्यंत कन्हान, साटक या केंन्द्रा द्वारे कन्हान परिसरात एकुण ८३६४ लसीकरण करण्यात आले आहे.
शासनाने दिनांक.५ मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक आणि दिनांक १ एप्रिल ला ४५ वर्ष व वरील नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन शनिवार दिनांक २४ एप्रिल पर्यंत प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे कन्हान ३८२०,टेकाडी २२३,कांन्द्री ५०३, खंडाळा (निलज) ३४८, जुनिकामठी १२९, जे एन दवाखाना कांन्द्री ११४६ असे एकुण ६१६९ तर प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक द्वारे साटक १७४०,घाटरोहणा ३७, निमखेडा २९२, आमडी १२६ असे एकुण २१९५ असे दोन्ही केंन्द्रा द्वारे एकुण ८३६४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावण्यात आली. दुसरा डोज प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे कन्हान ५७६, कांन्द्री १, खंडाळा (निलज) २, जुनिकामठी ५, जे एन दवाखाना कांन्द्री ५३ असे ६३७ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक ६६, आमडी ५ असे ७१ आतापर्यंत कन्हान परिसरात प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे ६ केंन्द्रात पहिला डोज ६१६९ साटक द्वारे ४ केंन्द्रात २१९५ असे ८३६४ तर दुसरा डोज कन्हान ६३७ व साटक ७१ एकुण ७०८ असे कन्हान व साटक केंद्रा द्वारे एकुण ९०७२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. या करिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ , कोरोना विभाग प्रमुख डॉ अन्सारी यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे डॉ योगेंद्र चौधरी व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक च्या डॉ वैशाली हिंगे, जे एन दवाखाना कांन्द्री च्या डॉ विजया माने सह कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. दिवसेदिवस कन्हान परिसर व नागपुर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कुठल्याही खोटया प्रचाराला बळी न पडता कोरोना लस लावुन नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून आपली व कुंटुबाची काळजी घेऊन कोरोना हद्दपार करण्यास सहकार्य करावे असे आव्हाहन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे डॉ योगेश चौधरी व साटक च्या वैशाली हिंगे हयानी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज