*कन्हान, साटक केंन्द्रा द्वारे १८० असे एकुण ८५४४ लसीकरण*
*कन्हान केंन्द्रात १५९ व साटक २१ असे १८० लसीकरण*
*प्राथ.आरोग्य केंद्र कन्हान पहिला डोज ६३२८ व साटक २२१६ असे ८५४४ लसीकरण*
*दुसरा डोज प्राथ.आ. केंद्र कन्हान ६३७ व साटक ७१ असे ७०८ एकुण ९२५२ लसीकरण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ४५ वर्ष व वरील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे १५९ व साटक २१ असे १८० लसीकरण करून ६ केंद्रात पहिला डोज ६३२८ साटक व्दारे ४ केंद्रात २२१६ असे ८५४४ तर दुसरा डोज कन्हान ६३७ व साटक ७१ एकुण ७०८ असे कन्हान व साटक केंद्रा व्दारे एकुण ९२५२ कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. (दि.५) मार्च पासुन आतापर्यंत कन्हान, साटक या केंद्रा व्दारे कन्हान परिसरात एकुण ८५४४ लसीकरण करण्यात आले आहे.
शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक आणि (दि.१) एप्रिल ला ४५ वर्ष व वरील नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्या करिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन सोमवार (दि.२६) एप्रिल पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १५९ व साटक २१ असे एकु ण १८०, कन्हान ३९७९, टेकाडी २२३, कांद्री ५०३, खंडाळा (निलज) ३४८, जुनिकामठी १२९, जे एन दवाखाना कांद्री ११४६ असे एकुण ६३२८ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे साटक १७६१,घाटरोहणा ३७, निमखेडा २९२, आमडी १२६ असे एकुण २२१६ असे दोन्ही केंद्रा व्दारे एकुण ८५४४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावण्यात आली. दुसरा डोज प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे कन्हान ५७६, कांद्री १, खंडाळा (निलज) २, जुनिकामठी ५, जे एन दवाखाना कांद्री ५३ असे ६३७ व प्राथ. आरोग्य केंद्र साटक ६६, आमडी ५ असे ७१ आतापर्यंत कन्हान परिसरात प्राथ. आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ६ केंद्रात पहिला डोज ६३२८ साटक व्दारे ४ केंद्रात २२१६ असे ८५४४ तर दुसरा डोज कन्हान ६३७ व साटक ७१ एकुण ७०८ असे कन्हान व साटक केंद्रा व्दारे एकुण ९२५२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. याकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ,कोरोना विभाग प्रमुख डॉ अन्सारी यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे डॉ योगेंद्र चौधरी व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या डॉ वैशाली हिंगे, जे एन दवाखाना कांद्री च्या डॉ विजया माने सह कर्म चारी आदी परिश्रम घेत आहेत. दिवसेदिवस कन्हान परिसर व नागपुर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भा व वाढत असल्याने कुठल्याही खोटया प्रचारा ला बळी न पडता कोरोना लस लावुन नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधा त्मक शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून आपली व कुंटुबाची काळजी घेऊन कोरोना हद्दपार करण्यास सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानचे डॉ योगेश चौधरी हयानी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज