Breaking News

*नैसर्गिक ऑक्सीजन मिळण्याकरिता कन्हान येथे पिपळाचे वृक्षरोपन* *अमोल साकोरे मित्र परिवारांचे जनहितार्थ सेवा कार्य.*

*नैसर्गिक ऑक्सीजन मिळण्याकरिता कन्हान येथे पिपळाचे वृक्षरोपन*

 

*अमोल साकोरे मित्र परिवारांचे जनहितार्थ सेवा कार्य.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन ऑक्सीजनची कमतरता भासत असल्यामुळे किती तरी लोकांचा बळी जात असल्यामुळे परिसरात नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अमोल साकोरे मित्र परिवार द्वारे हनुमान जयंती निमित्य कन्हान परिसरात ठिक – ठिकाणी पिपळाचे वृक्षरोपन करून नागरिकांना नैसर्गिक ऑक्सीजन मिळण्याकरिता जनहितार्थ सेवाकार्य केले.

कन्हान शहरात व परिसरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि मुत्यु दर सुध्दा वाढु लागल्याने नागरिकांच्या हितार्थ कोरोना विषाणु महामारी रोख ण्याकरिता कोरोना साखळी तोडुन कोरोना हद्दपार करण्याकरिता आणि नागरिकांना नैसर्गिक ऑक्सीजन मिळण्याकरिता अमोल साकोरे मित्र परिवार द्वारे मंगळवार (दि.२७) एप्रिल ला हनुमान जयंतीचे औचित्य साधुन कन्हान परिसरात विविध ठिकाणी पिपळाचे वृक्षरोपन करून जनहितार्थ सेवाकार्य केले. नागरिकांनी विना कारण घरा बाहेर निघु नये, गर्दी करू नये, मास्क, सेनिटाइजर व सोशल डिस्टेन्सचे काटेकोरपणे पालन करून कोरोना हद्दपार करण्याकरिता शासनाला, नगरपरिषद प्रशासनाला व कन्हान पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे भावनिक आव्हाहन अमोल साकोरे यांनी नागरिकांना केले आहे. याप्रसंगी प्रतीक भोपळे, प्रमोद दहीवलकर, हर्ष पाटील, मुन्ना मधुमटके सह अमोल साकोरे मित्र परीवार चे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …