*कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र व आशावर्कस यांना औषधी व साहित्याची मदत*
*कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणाचे सेवाभावी उपक्रम*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहर व परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणारे कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र व आशावर्कस यांना कोरोना विषाणु आजारांचा वाढत्या प्रादुर्भावात रूग्णांची सेवा करतांना तुटपुंजी व्यवस्था बघता कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाण द्वारे परिसरातील रूग्णांची व नागरिकांची सेवा करतांना अडचण होऊ नये यास्तव प्राथमिक आरोग्य केंंन्द्रास महत्वाच्या औषधी व डॉक्टर, नर्स, कर्मचारी व आशावर्कस यांना आवश्यक साहित्य नैतिकता म्हणुन भेट देत सेवाभावी मदत करण्यात आली.

कन्हान परिसरात कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत असुन अपुर्या व्यवस्थेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. असंख्य कोरोना रुग्ण उपचारासाठी सैरा-वैरा जीव वाचवण्याचे युद्ध लढत असतांना सर्वी कडे निराशाच, प्रचंड मरणाची दहशत, तर दुसरी कडे अपुरी-हतबल आरोग्य व्यवस्था, राजकीय पाप सर्व सामान्य नागरिकांनीच भोगावे का ? याचे उत्तर योग्य वेळी नागरिक देतीलच.

कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान-पिपरी शहरा सह गाडेघाट, जुनिकामठी, टेकाडी, कांन्द्री,सिहोरा,खंडाळा, निलज, बोरी, सिंगारदिप, गहुहिवरा गावातील मोठ्या लोक संख्येची आरोग्य व्यवस्था सांभाळीत आहे.कोरोना विषाणु आजाराचा वाढत्या प्रादुभावात रूग्णांची सेवा करताना तुटपुंजी व्यवस्था अडसर बघता परिसरातील नागरिकांचे आरोग्य, जिवन सुरक्षित करण्याच्या दुष्टीने लोकहितार्थ कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाण द्वारे प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान ला ऑक्सीमीटर, सॅनिटायझर, मास्क,हॅन्डग्लोज,फेसशिल्ड, जंतुनाशक, कप सायरप महत्वाच्या औषधी आणि डॉक्टर, नर्स, कर्मचारी व २५ आशावर्कस यांना सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, फेसशिल्ड, किट, जंतुनाशक, कप सायरप आदि आवश्यक साहित्य प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री चरपे, श्री पवार यांच्या उपस्थितीत नैतिकता जपत भेट स्वरूपात सेवाभावी मदत करण्यात आली. याप्रसंगी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव, दिलीप राईकवर, मोतीराम रहाटे, प्रविण गोडे, गोविंद जुनघरे, चंद्रशेखर कलमदार, गणेश भोंगाडे, अजय ठाकरे, निलेश गाढवे, सुनील सरोदे, ॠषभ बावनकर, निशांत जाधव, केतन भिवगडे, प्रदीप गायकवाड, ऋृषभ दुधपचारे, बंटी डाफ सह आदि प्रामुख्याने नागरिक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज