*नौकरी न मिळाल्याच्या नैराश्यातुन इंजीनिअर युवकांची पुलाखाली उडी मारून आत्महत्या*
*कन्हान पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल करुन मुतदेह नातेवाईकांना सोपवुन पुढील तपास सुरू केला आहे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – बी.ई शिक्षण घेऊन इंजिनिअर होऊन मागील एका वर्षापासुन नौकरी न मिळाल्याने निराश्या तुन कंटाळुन व कोरोना बाधित झाल्याने ३५ वर्षीय हेमराज वकलकर या युवकाने कन्हान नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याने कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथील हेमराज रामकृष्ण वकलकर वय ३५ वर्ष हा शुक्रवार दिनांक .२३ एप्रिल ला दुपारी २.३० वाजता च्या सुमारास घरी कुणालाही न सांगता निघुन गेला. त्याचा नातेवाईका कडे शोध घेतला असता तो कोठेही मिळुन न आल्याने फिर्यादी वडील रामकृष्ण वकलकर यांनी कन्हान पोलीस स्टेशन येथे मिसींग दाखल केल्याने रविवार दिनांक .२५ एप्रिल ला दुपारी १.४५ वाजता च्या सुमारास कन्हान पोलीस स्टेशन येथुन फोन केला की कन्हान नदीच्या पुलाखाली एका इसमा चा मुतदेह मिळाला आहे. तेव्हा पोहवा अरूण सहारे व फिर्यादी वडील यांनी कन्हान नदी पुलाखाली जाऊन पाहीले असता तो मुतदेह त्याच्या मोठा मुलगा हेमराज वकलकर चा होता. हेमराज रामकृष्ण वकलकर या युवकाने बी.ई परिक्षा पास हो़ऊन इंजिनिअर झाला होता. मागील एका वर्षापासुन नौकरी न मिळा ल्याच्या निराश्यातुन व कोरोना बाधित झाल्याने घरी कुणालाही न सांगता शुक्रवार दिनांक.२३ ला निघुन गेला आणि कन्हान नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. सदर प्रकरणी फिर्यादी वडील रामकृष्ण श्रावणजी वकलकर वय ६२ वर्ष रा स्वामी विवेकानंद नगर कन्हान यांचे रिपोट वरून कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात पोहवा अरूण सहारे व मंगेश सोनटक्के हयांनी कलम १७४ जाफॉ कायद्यान्वये मर्ग दा़खल करून मुतदेह नातेवाईकांना सोपवुन पुढील तपास करित आहे .
Maharashtra News Media सच की आवाज