*काटोल तालुक्यातील शेतकरी लाॅकडाऊन चे निर्बंधात ही लागला शेतीमशागतील*

*काटोल तालुक्यातील शेतकरी लाॅकडाऊन चे निर्बंधात ही लागला शेतीमशागतील*

कोंढाळी प्रतिनिधि :- दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – एकी कडे कोरोनाच्या दुसर्या लाटेचे गडद संकट व त्या संकटावर मात करण्यासाठी लागलेले लाॅकडाऊन असले तरी काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी (विषेशतः कोंढाळी भागातील) त्यास दूर ठेवत रखरखत्या उन्हात शेती कामे करण्यास सुरुवात केली आहे.येत्या अवघ्या महिनाभरात पेरणी करावी लागणार असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीला वेग आल्याचे दिसत आहे.


मागील तीन वर्षापसून सतत दुष्काळ , वादळी वाऱ्यासह गारपीट याप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील बळीराजा खचून गेला होता, तर यावर्षी कोरोनाशी झुंज देत बळीराजा पुन्हाः एका नव्या उमेदीने शेती कामात सहकुटूंब व्यस्त झालेले दिसत आहे .लॉकडोउन संपो की वाणी तरी वैश्विक महामारी कोव्हिड संक्रमणासारख्या संकटाशी झुंज देत शेतकरी पुन्हा खरिपाच्या पेरणीचे नियोजन करीत असल्याचे दिसून येत आहे .सध्या उन्हाचा पारा वाढला असला तरी बळीराजा, नांगरणी, वखरणी, शेणखत टाकणे, काटेरी झुडपे तोडणे, बांध दुरुस्ती आदी कामात मग्न झाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा तथा पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्याने येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामावर जास्त प्रमाणात अवलंबून राहावे लागते त्यामुळे येथील शेतकऱ्यावर सतत कर्जाचा डोंगर उभा झाला आहे.


त्यातच या कोरोनाचा प्रकोपात शासनाकडून लावण्यात आलेल्या लॉकडॉउन व कडक निर्बंध यामुळे शेतकरी राजा मेटाकुटीस आला आहे.तरीसुद्धा काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नेहमी प्रमाणे शेतीकरन्या करीता कंबर कसली असून त्यांनी शेती मशागतीच्या कामाला वेग दिला आहे.शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असतानाच रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्याचे दिसून येत आहे.मात्र त्या तुलनेत शासनाने शेत मालाचे हमी भाव वाढविले नाही .खरे पाहता शेतकऱ्यांचा आज पर्यंत शासनाच्या हमी भाव मृगजळच ठरत आला आहे.शेती साहित्य, बी बियाणे, रासायनिक खत, किटनाशकासह आता तर शेतात काम करणाऱ्या सालगडयाचे सुद्धा भाव वधारल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमी भाव नगण्यच म्हणावा असा आहे.


मागिल वर्षीच्या लॉकडाउन मध्ये सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते तसेच आर्थिक नियोजन बिघडले होते तर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असल्याने आर्थिक विवंचनेत अडकला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्याकडे सध्या पीक असले तरी खर्चासाठी नगदी रकमेची उणीव जाणवत होती.शेती कामे करण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या .मात्र यावर्षी सुदघा असलेल्या मागील वर्षीच्या लोकडॉउनच्या स्थितीत शेतकऱ्यांची मागचया वर्षीचिंच स्थिती आहे.अनेक शेतकऱ्याच्या घरात कापूस, सोयाबीन , तूर, हरभरा यांची विक्री न झाल्यामुळे वार्षिक ताळमेळ बिघडत असून आर्थिक व्यवहरासाठी लागणाऱ्या रकमेसाठी कसरत करावी लागत आहे .शेतीसंबंधी वस्तू खरेदी करण्यातही अडचणी येत आहे .कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडोउन असले तरी तोंडावर येत असलेला खरीप हंगामासाठी कोरोनाला दूर ठेवत शेतकरी शेत मशागतीची जोरदार तयारी करीत असल्याचे चित्र काटोल तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

या बाबतीत काटोल तालुक्याचे कृषी विभागाच्या नियोजना बाबतीत तालुका कृषी अधीकारी सुरेश कन्नाके यांना माहीती विचारली असता सांगितले की काटोल तालुक्यात मागील वर्षी 2020-या वर्षी ४९१५४हेक्टर मधे तृण धाण्य, कडधाण्य, गळीतधाण्य, भाजी- पाला,व फुल शेती ची पीक पेरणी केली होती.यावर्षी (2021-2022)या वर्षात ज्वार, मका,तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग, तीळ, कापुस, ऊस, भाजीपाला, व फुलशेती करिता एकूण ५४०००हेक्टरमधे तृण, कड, गळीत, व खरीफ हंगामात घेण्यात येणारे पीकाचे नियोजन करण्यात आल्यची माहिती ता कृ अ सुरेश कन्नाके व कोंढाळी कृषी मंडळ अधिकारी विक्रम यांनी दिली आहे ।
*खर्च व शातमालाला मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसत बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे.

शेतीउत्पादन चे कामात नांगरणी,कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक करने,रोटावेटर फिरवने या सर्व कामाला ट्रेक्टर चे सहाय्य लागत असते , मात्र याकरीता लागणारे डिजलच्या वाढत्या दरांमुळे मशागतीच्या खर्चात २५ते ३०टक्क्याने वाढ झाली आहे, खर्च शातमालाला मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे, अशी माहीती धुरखेडा येथील शेतकरी याकूब पठाण, कामठी चे कृष्णराव किनेकर, कोंढाळी चे शेतकरी रमेश वंजारी, यांनी दिली आहे, तर मागील वर्षी सीयाबीन ची शेती हातून गेली, यावर्षी सोयाबीन चे बीयाणे महागात पडत आहे, त्यातही सोयाबीन बीयाणे दर्जेदार असेललच हे सोयाबीन पीक पेरणी नंतर उगवणीनंतर समजेल असे मत मासोद चे शेतकरी प्रकाश बारंगे, खैरी चे प्रकाश वाघमारे, या शेतकर्यांनी माहीती दिली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …