*केंद्रीय मंत्री मा नितीनजी गडकरी यांनी ग्रामीण रुग्णालय जलालखेडा आणि मोवाड ला दिल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन/एन.आय.व्हि.(व्हेंटिलेटर) मशीन*

*भाजप युवा मोर्चा च्या मागणीला यश*
नरखेड तालुका प्रतिनिधि -श्रीकांत मालधुरे
नरखेड – मा केंद्रीय मंत्री. नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातुन
नरखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन मिळावे यासाठी काटोल विधानसभा प्रमुख चरणसिंग जी ठाकूर साहेब यांना भाजप युवा मोर्चा कडून निवेदन देण्यात आले होते..त्या मागणीची तात्काळ दखल घेत कोरोना बाधित बांधवांच्या उपचाराकरिता,आज जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा, प्राथमिक केंद्र मोवाड येथे चरणसिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्तिथी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन देण्यात आल्या.
तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या ,ऑक्सिजनचा तुटवडा त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर नसल्याने येथील कोविड रूग्णनानां आपला जीव गमवावा लागत आहे या सर्व बाबींचा विचार करता भाजप युवा मोर्चा ने काटोल न प सत्तापक्षनेते आणि विधानसभा प्रमुख चरणसिंगजी ठाकुर यांना केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्य केंद्रांना.ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली होती..
मा नितीन गडकरी साहेबांनी त्वरित दखल घेऊन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन.उपलब्ध करून दिल्या त्या मशीन जलालखेडा आणि मोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भाजप युवा मोर्चा तसेस, भाजपच्या पदाधिका-यां हस्ते वैद्यकीय अधीकारी डॉ,प्रशांत वैखंडे,डॉ.संजय सोळंकी यांना सुपूर्त करण्यात आल्या.याप्रसंगी काटोल विधानसभा प्रमुख मा.श्री.चरणसिंग ठाकूर,भाजप जिल्हाउपाध्यक्ष उकेश चौहान,भाजप युवा मोर्चा चे जिल्हाउपाध्यक्ष मयूर दंढारे,महामंत्री दिलेश ठाकरे,अनिल चौधरी,युवा मोर्चा कार्याध्यक्ष अक्षय विरखडे,शहर अध्यक्ष रवी माळोदे,सुरेश जी खसारे,मो.इस्माईल बारूदवाले,किशोर गाढवे, देविदास कंठाने,योगेश त्रिपाठी,नरेंद्र कळंबे,.दिनेश पांडे,अंकुश घावडे,श्रीकांत मालधुरे ,चेतन ठोंबरे,निखिल कठाने,नितीन बोकडे,संदीप राकेश,नितीन निमसरे, युवा मोर्चा चे तसेस मोवाड शहर भाजपचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी मा..नितीन गडकरी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांचे आभार मानले.
Maharashtra News Media सच की आवाज