Breaking News

*कळमेश्वर पोलिसांची कारवाई* *गौंडखैरी पारधी बरड येथील दारू भट्टीवर छापे एकुण 42 लाखाचा मुद्देमाल जप्त*

*कळमेश्वर पोलिसांची कारवाई*

*गौंडखैरी पारधी बरड येथील दारू भट्टीवर छापे एकुण 42 लाखाचा मुद्देमाल जप्त*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

कळमेश्वर – पोलिस स्टेशन हद्दीतील गौंडखैरी येथील पारधी बरड येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून तीची मोठया प्रमाणावर आजूबाजूचे परिसरात विक्री होत असल्याची गोपनिय खबर कळमेश्वर पोलिसांना मिळाल्याने मा . पोलिस अधिक्षक श्री . राकेश ओला , मा . उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अशोक सरंबळकर यांचे मार्गदर्शनात व पोलिस स्टेशन कळमेश्वर चे प्रभारी अधिकारी श्री आसिफराजा शेख यांचे नेतृत्वाखाली दि . 30/04/2021 रोजी पहाटे 07.00 वा . सुमारास पोलिस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील गौंडखैरी येथील पारधी बरड येथे सुरू असलेल्या अवैध दारू भट्टीवर छापे मारून एकुण कि . 42,00,000 / -रूपयाचा मुद्देमाल जप्त केला . यातील 22 आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली असून सर्व आरोपीतांवर पोलिस स्टेशन कळमेश्वर येथे गुन्हे दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे . सदर कारवाई दरम्यान एकुण 1840 लिटर कच्चे रसायन सडवा , 475 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली असून दारूभट्टी साठी लागणारे एकुण 18 ड्रम , घमेले व इतर साहित्य जप्त करून गावठी दारूच्या भट्टया उद्धस्त करण्यात आल्या आहे . सदरची कार्यवाही ही नागपुर ( ग्रामिण ) पोलीस अधिक्षक श्री . राकेश ओला , अप्पर पोलीस अधिक्षक श्री राहुल माकणीकर , उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर श्री . अशोक सरंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो . स्टे . कळमेश्वरचे पोलीस निरीक्षक श्री . आसिफराजा शेख यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्री लवार पोलिस स्टेशन कळमेश्वर येथील सपोनि श्री मुंडे , खडसे , मेश्राम , मसपोनि सावळा , पोउपनि बूंदे , मुंडे , गायकवाड , सफौ धुर्वे , पाली , पोहवा मन्नान , उईके , पोना मुदमाळी , बोरकर , पोशि उईके व कळमेश्वर पोलिस स्टेशन इतर कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील अधिकारी व कर्मचारी हजर होते .*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …