Breaking News

*कन्हान स्व:ईच्छा कडक लाॅकडाऊन ला व्यापारी, दुकानदारांचा उत्तम प्रतिसाद* *भाजीपाला व चिल्लर विक्रेता दुकानदार महासंघात नाही – अकरम कुरैशी.* *इनमिन दुकानदारांच्या स्व:ईच्छा लॉकडाऊन ला विरोध करून काय साध्य केले ?*

*कन्हान स्व:ईच्छा कडक लाॅकडाऊन ला व्यापारी, दुकानदारांचा उत्तम प्रतिसाद*

*भाजीपाला व चिल्लर विक्रेता दुकानदार महासंघात नाही – अकरम कुरैशी.*

*इनमिन दुकानदारांच्या स्व:ईच्छा लॉकडाऊन ला विरोध करून काय साध्य केले ?*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे व किती तरी लोकांचा बळी जात असल्यामुळे परिसरातल्या नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतांना कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघाने वैद्यकीय सेवा, दुध डेअरी व अतिआवश्यक दुकाने सोडुन व्यापारी, दुकानदारांच्या सहमतीने कन्हान ला स्वईच्छेने सात दिवस कडक लाॅकडाऊन लोक हितार्थ निर्णयास चांगला प्रतिसाद मिळाला असुन या निर्णयाचा विरोध करणार्या इनमिन दुकानदारांनी विरोध करून काय साध्य केले हा शहरवासीयांना चिंतनाचा विषय नागरिकांच्या चर्चेतुन येत आहे.
कन्हान शहर व परिसरात कोरोना संसर्ग रूग्णांची वाढती संख्या आणि मुत्यु दर सुध्दा झपाट्याने वाढु लागल्याने समाजालाही काही आपले देणे लागते. या सामाजिक बांधिलकीतुन प्रेरित होऊन नागरिकांच्या हितार्थ कोरोना संसर्गााचा प्रादुर्भाव, महामारी रोखण्याकरिता कोरोना साखळी तोडुन कोरोना हद्दपार करण्यास एक पर्याय म्हणुन कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघाने कन्हान – पिपरी नगरपरिषद व कन्हान पोलीस प्रशासनास सहकार्या च्या दुष्टीने गुरुवार दिनांक.२२ एप्रिल ला कोरोना संसर्ग रोखथाम च्या पार्श्वभुमिवर कन्हान – कांन्द्री ला वैद्यकीय सेवा , दुध डेअरीचे दुकानें व अतिआवश्यक दुकानें सोडुन सर्व व्यापारी दुकाने स्व:ई च्छेने सोमवार दिनांक.२६ एप्रिल ते रविवार २ मे पर्यंत सात दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येत असतांना इनमिन दुकानदारांनी शासनाच्या नियमावली सांगत लॉकडाऊनला विरोध करून भाजीपाला व इनमिन दुकाने सुरू करण्यास प्रवृत्त केले. यामुळे सोशल डिस्टेन्स , मास्क, गर्दी टाळणे, वेळेचे बंधन, आरटीपीआर तपासणी अहवाल आदि शासनाच्या कोरोना रोखथाम नियमावलीची दुकाने उघडणार्या दुकानदारांन कडुन अमलबजावनी करण्याची मागणी कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्याधिकारीस निवेदन देऊन शासनाच्या नियमानुसार ७ ते ११ पर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची मागणी करणार्यांनी नैतिक जवाबदारी का घेऊ नये ? कन्हान परिसरातील नागरिकांच्या जनहितार्थ कन्हान स्व:ईच्छा कडक लॉकडाऊ न ला विरोध करणार्यांनी काय साध्य केले. हा सुध्दा शहरवासीयांचा महत्वाचा चिंतनाचा विषय चर्चेतुन समोर येत आहे.

*दुकानदार महासंघाच्या कडक लॉकडाऊनला दुकानदार, नागरिकांचा स्वयंफुर्त उत्तम प्रतिसाद – मा. प्रकाश जाधव.*

देशात, राज्यात, नागपुर जिल्ह्या सह कन्हान परिसरात कोरोना चा झपाटयाने वाढता प्रादुर्भाव बघता सामाजिक बांधिलकीतुन नागरिकांच्या हितार्थ कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघाने योग्य वेळी स्व:ईच्छा सात दिवस कडक लॉकडाऊन ला शहरात पहिल्यांदा दुकानदार व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत जनहितार्थ शासनाला सहकार्य करित असल्याने कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघ व शहरवासीयांचे माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठाणा चे अध्यक्ष मा. प्रकाश जाधव हयांनी अभिनंदन केले.

*कन्हान-कांन्द्री दुकानदारांचे कडक लॉकडाऊन ला ९९% प्रतिशत समर्थन – अकरम कुरेशी.*

कन्हान परिसरात अतिवेगाने वाढणार्या कोरोना संसर्ग व मुत्यु प्रमाण बघता शहर व परिसरातील नागरिकांच्या हितार्थ कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरिता कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघा द्वारे शहरात सात दिवस कडक लॉकजाऊन ला दुकानदारांनी ९९ % प्रतिशत समर्थन केले असुन नागरिकांचा सुध्दा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भाजीपाला व चिल्लर दुकाने महासंघात नाही. लॉकडाऊन ला विरोध करून काही दुकाने सुरू करण्यास प्रवृत्त करणार्यांनी शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीची अमलबजावणी करण्याची नैतिक जवाबदारी घ्यावी अशी प्रतिक्रिया कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघ चे अध्यक्ष अकरम कुरेशी यांनी महाराष्ट्र न्युज मीडिया ला दिली आहे.
कन्हान स्व:ईच्छा कडक लाॅकडाऊन ला व्यापारी, दुकानदारांनी व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर , नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघा चे अध्यक्ष अकरम कुरैशी , सचिव प्रशांत बाजीराव मसार , सचिन गजभिए , नितिन रंगारी , चंद्रशेखर कळमकर , संजय खोब्रागडे , राम तदाणी , प्रदीप गायकवाड , मोटवाणी , बापु चकोले , अशोक मोरपाना , सुनिल बारईकर , चिंदु मालाधरे , नितीन मेश्राम , सह आदि व्यापारी दुकानदारांनी आभार व्यक्त केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …