Breaking News

*सांगोळा येथील संजय पेटकर यांचा सत्कार* *ग्रामीण भागातील गावातील विकास कामासाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी समोर – सौ संजना बोंडे सरपंच*

*सांगोळा येथील संजय पेटकर यांचा सत्कार*

 

*ग्रामीण भागातील गावातील विकास कामासाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी समोर – सौ संजना बोंडे सरपंच*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना – आदिवासी बहुल तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या एका अधिकारी यांचा नुकताच सागोळा ग्रामपंचायत कार्यालयात आगळावेगळा कार्यक्रमात येथील सरपंच सौ संजना सचिन बोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
येथील दि 30 ,4 ,2021 ला अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाऊंडेशन लि आवाळपुर सि, एस आर विकास चे श्री संजयजी पेटकर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. कोरपना तालुक्यातील त्यांनी ग्रामीण भागातील सी एस आर फंडातून खूप भरपूर विकास कामे गावा गावात पोहोचवलीत त्यामुळे त्यांच्या ग्राम पंचायत सांगोडा कडून सेवानिवृत्त निरोप सत्कार समारंभ शाल व श्रीफळ देऊन सरपंच सौ संजना सचिन बोंडे यांच्या हस्ते करण्यात आला. व सी एस आर विकास चे नविन खाते मिळाल्या बद्दल श्री सतीशजी मिश्रा साहेब यांच्या पण याच कार्यक्रमात शाल व श्रीफल देवून सत्कार माजी सरपंच श्री सचिन प्रभाकर बोंडे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी गावातील आजी .माजी सर्व सदस्य यावेळी अगदीच उपस्थित होत हे विशेष कोरोनाची लागण होणार नाही याची खबरदारी घेवून या आगळावेगळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …