*विधि संघर्ष ग्रस्त बालकाचा मुलीवर केला अतिप्रसंग*
*फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान:: – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नेहरू गेट च्या समोर खदान नंबर ३ कडे जाणार्या रस्त्याच्या बाजुला मुलगी बकर्या चारत असतांना विधि संघर्ष ग्रस्त बालकाने मुलीवर अतिप्रसंग केल्याने पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध तक्रार टाकले असता कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .

कन्हान पोलीसां कडून प्राप्त माहिती नुसार शुक्रवार दिनांक .३० एप्रिल ला दुपारी २:३० ते ५:३० वाजता च्या सुमारास फिर्यादी यांची अल्पवयीन पिडीत मुलगी ही आपल्या भावा सोबत नेहरु गेट च्या समोर खदान नंबर ३ कडे जाणार्या रस्त्याचा बाजुला बकर्या चारत असतांना आरोपी विधि संघर्ष ग्रस्त बालकाने पिडिता ही चे आंगात घातलेले कपडे काढुन तिला उबडे करून तिचा अंगावर लोटुन तिचेवर अतिप्रसंग केला व ती ओरडु नये म्हणुन तिचे तोंड दाबले. असे फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध भादवी कलम ३७६ अ ब सह लैंगिक अपराधा पासुन बालकाचे सरक्ष अधिनियम कायदा २०१२ चे कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस बालसुधार गृहात पाठवुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे परिवेक्षाधीन पोलीस उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस अधिकारी एपीआई नंदा पाटील करीत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज