Breaking News

*संजोग चिट फंड च्या वतीने ऑक्सिजन मशीन भेट*

*संजोग चिट फंड च्या वतीने ऑक्सिजन मशीन भेट*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – प्रशासनाच्या आव्हानाला साद घालत शहरातील संजोग चिट फंड्स प्राव्हेट लिमिटेड वरोरा च्या वतीने सामाजिक आपुलकीची जाणीव ठेवत कोरोना काळात वरोरा उपजिल्हा रुग्णालयला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन भेट दिली.

वरोरा शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन ची आवश्यकता भासत आहे. शहरातील काही सामाजिक संस्थानी या बाबतीत पुढाकार घेतल्याने त्यांच्या कौतुक होत आहे. ही मशीन लोकउपयोगी पडेल असे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील म्हणाले.

याप्रसंगी तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ बाळ मुंजनकर , नायब तहसीलदार काळे तसेच वरोरा संजोग चिट फंड्स प्राव्हेट लिमिटेड चे संचालक तसेच  ,शिवसेना जिल्हाप्रमुख , नितीन मत्ते,   बंडू देउळकर , गजानन खर्चे, संजय बोढे,  अजय गुप्ता, ठाकुरदास चांडक उपस्थित होते. 

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …