*आयपीएल मँच सट्टेबाजी उघड*
*आरोपी कडून एक लक्ष नव्वद हजारोचा मुद्देमाल जप्त*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर ःस्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस ठाणे खापा हद्दीत गस्तकरित असतांना त्यांना गोपनीय माहितगारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की , बिचवा – वरपानी रस्त्याचे बाजुला असलेल्या एका शेतात काही इसम हे आयपीएल लीगच्या क्रिकेट सामन्यावर खायवाडी करित आहेत . अश्या प्राप्त माहितिच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने 17.40 वाजता बिचवा – वरपानी डांबरी रस्त्याचे बाजुला असलेल्या एका शेत शिवारातील टीनाचे शेडमध्ये धाड टाकली असता तेथे आरोपी क्र . 1 ) कार्तिक गणेश भट , वय 28 वर्ष , रा . झिंगाबाई टाकळी , नागपूर , 2 ) रितेश कृष्णाजी ठाकरे , वय 35 वर्ष , रा . झिंगाबाई टाकळी , नागपूर , 3 ) पवन पुरूषोत्तम इंगळे , वय 30 वर्ष , रा . झिंगाबाई टाकळी , नागपूर , 4 ) श्रीकांत गणेश भट , वय 32 वर्ष , रा . झिंगाबाई टाकळी , नागपूर , 5 ) ईशांत इर्शाद खान , वय 28 वर्ष , रा . जाफर नगर नागपूर , 6 ) आशिष लक्ष्मण गोयले , वय 27 वर्ष , रा . वोक्स कुलर , कोराडी नाका चौक , नागपूर हे दुरचित्रवाणीवर सुरु असलेल्या सनराईजर्स हैद्राबाद विरुध्द राजस्थान रॉयल्स या सामन्यावर त्यांचे आर्थीक फायद्याकरीता मोबाइल फोनवर बोलून खायवाडी करतांना मिळुन आले . आरोपीतांच्या ताब्यातून क्रिकेट सट्टा करिता वापरण्यात येत असलेला 1 टीव्ही संच , 12 मोबाइल व रोख रक्कम 9140 / – रुपये अशाप्रकारे एकुण 1,90,339 / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . पोलिस ठाणे खापा येथे आरोपीतांविरूद्ध अप.क्र . 122/2021 , महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम 12 ( अ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात येउन आरोपीतांना पुढिल कायदेशीर कार्यवाही करिता पो.स्टे . खापा यांचे ताब्यात देण्यात आले आहे .
सदरची कार्यवाही मा . श्री . राकेश ओला पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण , मा . श्री राहुल माकनीकर , अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रा . , यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . अनिल जिट्टावार यांचे आदेशाने सपोनि राजीव कर्मलवार , पोउपनी सचिन मत्ते , हेकॉ नाना राऊत , नापोशी राजेंद्र रेवतकर , पोशि रोहन डाखोरे , पोशि विपिन गायधने , अमोल वाघ , मपोशी नम्रता बघेल व सफौ साहेबराव बहाळे यांनी पार पाडली.
Maharashtra News Media सच की आवाज