*कोरोना योद्धांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याची मागणी*
*नगरसेविका संध्याताई व महामंत्री उज्वल रायबोले यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कामठी – कामठी शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने प्रभाग क्रमांक १५ येथील तींघांच्या मृत्यु झाल्याने या तीघांना शासनाच्या नियमानुसार प्रत्येकी कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका संध्या रायबोले व महामंत्री उज्वल रायबोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव ठाकरे यांना ई.मेल आ.ई.डी द्वारे निवेदन पाठवुन करण्यात आली आहे .

निवेदनात सांगितले कि कामठी शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे प्रभाग क्रमांक १५ येथील रहिवासी व नगर परिषद चे स्वच्छता कर्मचारी विजय गणेश बरोंडे , गौतम नगर छावणी येथील रहिवासी सौ विणाताई धम्मरत्न तांबे, तिरंगा चौक रामगढ येथील रहिवासी लक्ष्मीताई रामकृष्ण ऊके असे दोन अंगणवाडी सेविकाचा व एक नगर परिषद कर्मचारी असे तीघांना कोरोनाची लागन लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान अकाली मृत्यू झाला असून या तीनही फ्रंट लाईन हेल्थ वर्कर ला शासनाच्या नियमानुसार प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका संध्याताई रायबोले व महामंत्री उज्वल रायबोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री उध्दव ठाकरे यांना ई.मेल आ.ई.डी द्वारे निवेदन पाठवुन करण्यात आली आहे .
तसेच केंन्द्रीय मंत्री मा.श्री नितिन गडकरी ,रामटेक लोकसभा खासदार मा.श्री कृपाल तुमाने ,आरोग्य मंत्री मा.श्री राजेश टोपे , विरोधी पक्ष नेते मा.श्री देवेंन्द्र फडणवीस ,माजी पालकमंत्री मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना देखील निवेदन मेल करण्यात आले असुन कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांना सुद्धा एक निवेदन देऊन या गंभीर समस्ये बाबत अवगत केले .
या प्रसंगी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले , कामठी नगर परिषद चे विरोधी पक्ष नेते लालसिंग यादव , नगरसेवक प्रतिक पडोळे सह आदि नागरिक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज