Breaking News

*टेकाडी बस स्टाप चारपदरी उडाण पुलावरून मुलीची उडी घेऊन आत्महत्या की हत्या ?*

*टेकाडी बस स्टाप चारपदरी उडाण पुलावरून मुलीची उडी घेऊन आत्महत्या की हत्या ?*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागपुर वरून दुचाकीने आलेले युवक व युवती यांचा टेकाडी बस स्टाप जवळील चारपदरी उडाण पुलावर भांडण होऊन युवतीची पुलावरून उडी मारून आत्महत्या की हत्या ?
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांकद.३ मे ला सायंकाळी ४.१५ ते ४.४५ वाजता दरम्यान नागपुर वरून आलेल्या फिर्यादी जब्बार मोबीन खान वय २३ वर्ष राहणार. हसनबाग चॉंदनी चौक नागपुर व ममता प्रकाश बोराडे वय २८ वर्ष राहणार. मुन्शी गल्ली गौराबाई मठावर महाल नागपुर हे दोघेही नागपुर वरून एँक्टीव्हा दुचाकी क्र एमएच ४९ ए बी ७१८७ ने येऊन टेकाडी बस स्टाप जवळील चारपदरी उडाणपुलावर थांबले असता दोघात भांडण होऊन युवती ममता बोराडे हीने पुलावरून खाली उडी मारल्याने गंभीर जख्मी झाली.या घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोहचुन युवती गंभीर जख्मी असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे उपचारार्थ नेले असता तिची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी नागपुर ला रवाना केले असता मेडीकल रूग्णालय नागपुर ला तिचा उपरारा दरम्यान मुत्यु झाला. टेकाडी चारपदरी उडाण पुलावरून उडी घेऊन मुलीची आत्महत्या की हत्या ? अशा परिसरातील नागरिकांत चर्चा सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात पीएसआई जावेद शेख हयांनी मर्ग १७४ दाखल करून पुढील तपास करित आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …