*विश्वमेघ उच्च. माध्यमिक विद्यालय धर्मापूरी येथील विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरावर निवड*

धर्मापूरी प्रतिनिधि-
धर्मापूरी- नागपूर क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत ७० किलो वजन गटामध्ये विश्वमेघ उच्च. माध्य. विद्यालयातील विद्यार्थी सर्वेश मालाधरे आणि अक्षय तितिरमारे यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय स्थान मिळवून जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत विजय मिळविला आहे. तसेच राज्य स्तरावर होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. खोडे सर, पर्यवेक्षक श्री. चटोले सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे, तर प्रशिक्षक बागडे सर, मसराम सर, वर्गशिक्षक बावणे सर यांचे आभार मानले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज