*कन्हान नगरपरिषद व पोलीस प्रशासना द्वारे नियमाचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई.*
*सोशल डिस्टेसिंग व मास्क न वापरणार्यां न कडुन ३ लाख १७ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल.*
*कन्हान – पिपरी नगरपरिषद चे कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरी यांची माहिती*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने नियमावली कडक केली असुन जिल्हाधिकारी रविंन्द्र ठाकरे यांचा आदेशानुसार कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्रात दिनांक .१५ मे २०२१ च्या कालावधी पर्यंत कन्हान शहरात व परिसरात कडक नियमावली चे आदेश लागु असुन आता पर्यंत शहरात शासनाच्या नियमाचे उल्लंघन म्हणजे सोशल डिस्टेसिंग, मास्कचा वापर न करणार्यांन कडुन कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन व कन्हान पोलीस प्रशासना ने एकुण ३ लाख १७ हजार पाचशे रुपयांचा दंड वसुल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे .
महाराष्ट्र राज्यात, नागपुर जिल्हा व कन्हान शहरात परिसरात कोरोना चा वाढत्या पार्श्वभुमीवर राज्य शासना द्वारे कडक नियमावली सह संचारबंदी लागु करण्यात आल्याने सध्याच्या परिस्थितीत राज्यात कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगरपरिषद क्षेत्रात १५ मे २०२१ या कालावधीत राज्य शासनाने वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वस्तु वगळुन बाकी सर्व कडक नियमावली लागु करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने कन्हान शहरात परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्हाधिकारी रविंन्द्र ठाकरे यांच्या आदेशानुसार कन्हान-पिपरी नगर परिषद क्षेत्रात १५ मे २०२१ या कालावधी पर्यंत सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी सर्व प्रकारचे खाद्यान्ने यात चिकन, मटन, पोल्ट्री, मासे व अंडीची दुकानें, शेती उत्पादना संबंधित दुकाने, प्राण्याचे अन्नपदार्थ विकणारी दुकानें, पावसाळी साहित्य विकणारी दुकानें यांना सकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले असुन या दरम्यान सर्व दुकानांमधुन होम डिलेव्हरी मात्र सकाळी ७ ते रात्री ८ वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे . परंतु कन्हान शहरात परिसरात शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन व कन्हान पोलीस प्रशासनाने मास्क चा वापर न करणार्यं वर २,००,००० रुपयांचा दंड व सोशल डिस्टेसिंगचे पालन न करण्यार्यां वर १,१७,५०० रुपयांचा दंड असा एकुण ३,१७,५०० रुपयांचा दंड एप्रिल २०२० पासुन आता पर्यंत वसुल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती कन्हान-पिपरी नगरपरिषद चे कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरी यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या नवीन कडक नियमावलीचे काटे कोरपणे पालन न करणार्या व्यापारी दुकानदार, नागरिकांवर व आस्थापने वर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ आणि भारतीय दंड संहिता चे कलम १८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असुन कोणी ही विनाकारण घरा बाहेर पडु नये, गर्दीत जाणे टाळावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आव्हाहन कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन व कन्हान पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज