*रुग्णालयात कोवीशील्डचा तुटवडा दोन दिवसा पासुन लसीकरण बंद*
*माजी आमदार अमर काळे यांनी मारला रुग्णालयाचा फेरफटका घेतली माहिती*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
आर्वी – येथील रुग्णलयात दोन दिवसापासुन कोवीशील्ड लसीचा तुटवडा असल्याने ४५ वर्षाच्या वरील नागरिकांचे लसीकरण केल्या जात नसल्याची माहिती नगरसेवक रामु राठी यांच्या माध्यमातुन मिळताच माजी आमदार अमर काळे यांनी सोमवारी (ता.१०) येथील उपजिल्हा रुग्णलयाचा फेरफटका मारुन संपुर्ण माहिती घेतली आणी लसी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या.
कोरोना विषाणुच्या संसर्गा पासुन संरक्षण मिळावे या करीता येथील उपजिल्हा रुग्णालयात कोवशील्डचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र दोन दिवसापासुन लसींचा तुटवडा निर्माण झाला आणी ४५ वर्षाच्या वरील नागरिकांचे लसीकरण करणे ठप्प झाले. याची माहीत नसल्याने अनेक नागरिकांवर परत जाण्याची वेळ आली यातील बाहेर गावावरुन आलेल्या नागरिकांना विनाकारण त्रास तर सहन करावाच लागला शिवाय आर्थीक भुर्दंड सुध्दा पडला. कोरोनाच्या या संकट काळात रात्रंदिन सेवा देत असलेले नगर सेवक रामु राठी यांच्या माध्यमातुन याची माहिती माजी आमदार यांच्या पर्यंत पोहचली त्यांनी वेळ न दौडता सोमवरी येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. वैध्यकीय अधिक्षक डॉ. मोहन सुटे, डॉ. नंदकिशोर कोल्हे, डॉ. आशिष सोनी यांच्या जवळुन कोवीशिल्ड व ईतर औषधींच्या पुरवठाच्या माहिती घेतली. याच दरम्यान रुग्णालयाचा फेरफटका मारुन व्यवस्थेची पाहणी केली.
प्राणवायु टँक, बेड व रुग्णवाहीकेची आवश्यकता
उपविभागीय रुग्णालयाला १०० खाटांची मंजूरी मिळाली आहे. एक वर्षा पासुन काम रखडले आहे. याचे काम त्वरीत झाल्यास येथे व्हॅटीलेशन युनीट तयार करण्यास कोणतीच अडचण जाणार नाही. प्राणवायु साठवीण्याकरीता टँक निर्माण केल्यास प्राणवायुची ने आण करावी लागणार नाही. रुग्णालयावर १०३ गावांची जबाबदारी आहे. याशिवाय आष्टी, कारंजा येथील रुग्ण सुध्दा येथे येतात यांच्या सोयी करीता अत्याआधुनीक रुग्णवाहीकेची आवश्यकता आहे याशिवाय खाट सुध्दा खराब झाल्या असुन आधुनीक सुवीधा युक्त खाटा मिळाल्यास रुग्णाची योग्य पध्दतीने सोय होईल आणी तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास सोपे जाईल अशी माहिती वैध्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे आणी डॉ. नंदकीशोर कोल्हे यांनी चर्चे दरम्यान दिली.
शंभर टक्के लसीकरणाकरीता ३५ हजार डोजची आवश्यकता
सुमारे १ लाख ४८ हजार ८८० नागरिक येथील उपजिल्हा रुग्णालयाची सेवा घेतात. यातील ४५ वर्षाचेवरील ६ हजार ८८४ लोकांनी कोवीशील्ड लसीचा पहिला डोज घेतला आहे. तर २०९० लोकांनी दुसरा डोज घेतला आहे. याशिवाय १८ ते ४४ वर्ष वयाच्या ८८० लोकांचे लसीकरण झाले असुन अजुन १२० डोजेस शिल्लक आहे ते सुध्दा दोन दिवसात संपणार आहे. लोकसंख्येचा विचार केल्यास ४५ वर्षाच्या वरील नागरिकांच्या शंभर टक्के लसीकरणाकरीता आणखी ३५ हजार डोजेसची आवश्यकता भासणार आहे.

शासनस्तरावर मागणी मांडतो
रुग्णालयात अत्याधुनीक सुवीधा निर्माण करणे हि काळाची गरज ठरली आहे. याकरीता शासनस्तरावर मागणी माडतो तर आवश्यकतेनुसार कोवीशील्ड लसीचा पुरवठा व्हाव याकरीता राज्याचे आरोग्य मंत्री व पालक मंत्री सुनील केदार यांचे साबत संपर्क साधुन पर्यंत्न करतो असे माजी आमदार अमर काळे यांनी यावेळी सांगीतले.
Maharashtra News Media सच की आवाज