*तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणने व लसीकरणाची गती वाढवने मुख्य लक्ष – तहसीलदार सतीश मासाळ*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः दिनांक १०/०५/२०२१ ला ग्रामपंचायत वाघोडा येथे कोविड १९ या आजाराचा गावातील प्रादुर्भाव कमी करणे व लसीकरण बाबत गती वाढविणे करिता सभा घेण्यात आली व या सभेत उपस्थित अधिकारी यांनी सभेला मार्गदर्शन केले सभेकरीता मां.श्री मसाळ साहेब तहसीलदार, मां. श्री गरुड साहेब खंड विकास अधिकारी पंचायत समिती सावनेर, मा. श्री वाघ साहेब, तालुका आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद सदस्या ज्योती सीरसकर, ग्रामपंचायत सरपंच श्री मंगल कडनायके, उपसरपंच श्री अनिल चाफले ग्रा.पं.सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तलाठी , शिक्षक, आशावर्कर ,अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिष्टीत नागरिक , राशन दुकानदार, व ग्रा.पं.कर्मचारी, संगणक परिचालक हजर होते.
याप्रसंगी लसीकरणाची गती वाढविण्यासाठी तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊण माझे कुटुंब माझी जबाबदारी सोबतच माझा परिसर, माझे गाव कोरोना मुक्त होण्याकरिता पुढाकार घेणे गरजेचे आहे असे विचार याप्रसंगी तहसीलदार सतीश मासाळ यांनी व्यक्त करीत म्हटले की शासन प्रशासन आपल्या स्तरावर पुर्ण प्रयत्न करत आहेत परंतू जोपर्यंत यात जनप्रतिनीधी, समाजसेवी व लोक सहभाग मीळत नाही तोपर्यंत या योजना यशस्वी होने शक्य नाही असे परखड मत व्यक्त करत नागरिकांना सहकार्य करण्याचे निवेदने केले.
Maharashtra News Media सच की आवाज