*परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांचा उत्कुष्ट कार्याबद्दल सत्कार*
*मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघ व्दारे छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : –कन्हान पोलीस स्टेशन येथे १ महिना १२ दिवसात परिवेक्षाधिन पोलीस उप अधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर हयांनी कन्हान पोलीस थानेदार म्हणुन कोरोना चा बिकट संकट काळात परिसरात उत्कृष्ट कार्य करित शांती सुव्यवस्था प्रस्थापित केल्याबद्दल मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार कन्हान द्वारे मा.श्री सुजित कुमार क्षीरसागर साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करून कर्तव्यदक्ष भावी कार्यास शिवशुभेच्छा देण्यात आल्या.
कन्हान पोलीस स्टेशन येथे १ एप्रिल २०२१ ला परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक मा.श्री सुजितकुमार क्षीरसागर हयांनी कन्हान थानेदार म्हणुन पदभार सांभाळुन परिसरातील रेती, कोळसा चोरी व इतर अवैद्य धंद्यावर अंकुश लावुन कोरोना च्या बिकट काळात दररोज विविध कार्यवाई करून गुन्हेगारांना पकडुन गुन्हे दाखल केल्याने अवघ्या १ महिना १२ दिवसात कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात उत्कृष्ट कार्य करित शांती सुव्यवस्था प्रस्थापित करित काटोल पोलीस स्टेशनला कर्तव्यावर प्रस्थान करित असल्याने बुधवार (दि.१२) मे २०२१ ला कन्हान पोलीस स्टेशन येथे सायंकाळी मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघ कन्हान द्वारे परिवेक्षाधिन पोलीस उप अधिक्षक मा.श्री सुजितकुमार क्षीरसागर साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करून भावी जिवनात व पोलीस विभागात प्रामाणिक पणे उत्कृष्ट कर्तव्यदक्ष कार्य करून उन्नती करण्याकरिता मराठा सेवा संघ कन्हानचे शांताराम जळते, ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कमल सिंह यादव, सुनिल सरोदे, ऋृषभ बावनकर आदि ने उपस्थित राहुन शिवशुभेच्छा दिल्या .
*सामाजिक कार्यकर्त्यांनी केला सुजित कुमार क्षीरसागर यांचा सत्कार*
कन्हान पोलीस स्टेशन येथे १ एप्रिल २०२१ ला परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी कन्हान थानेदार म्हणुन पदभार संभाळुन क्षेत्रातील अवैध धंद्यावर अंकुश लावुन कोरोना च्या संकट मध्ये रोज विविध कारवाई करुन परिसरात उत्कृष्ट कार्य करित शांती सुव्यवस्था प्रस्थापित करीत काटोल पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर प्रस्थान करित असल्याने बुधवार दिनांक १२ मे २०२१ ला कन्हान पोलीस स्टेशन येथे सामाजिक कार्यकर्ता द्वारे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर साहेबांना शाल , श्रीफल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत वाघमारे , रजनिश मेश्राम , अखिलेश मेश्राम , शैलेश माटे , विक्की उके , निखिल रामटेके , सिद्धार्थ ढोके , भगवान सरोदे , दिनेश ढोके , सुजित पानतावने सह आदि नागरिक उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज