*प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर लसीकरण स्थानिक नागरिकां साठीच प्राधान्याने करण्याची मागणी*

*भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांचे ई.मेल.आईडी द्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासना द्वारे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर १८-४४ वयोगटातील युवक युवतीचे लसीकरण मोहिम सुरु केले आहे . परंतु आॅनलाईन नोंदणी पद्धत सुरु केल्याने बाहेरील लोक लसीकरण करुन घेत आहे आणि स्थानिक नागरिक लसीकरण पासुन वंचीत राहत असल्यामुळे भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांनी ई.मेल. आईडी. द्वारे राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पत्र पाठवुन प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर लसीकरण स्थानिक नागरिकांसाठीच प्राधान्याने करण्याची मागणी केली आहे .

देशात , राज्यात , जिल्ह्यात , तालुक्यात व कन्हान शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासना द्वारे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर १८-४४ वयोगटातील युवक युवतीचे लसीकरण मोहिम सुरु केले आहे . परंतु लसीकरण आॅनलाईन नोंदणी पद्धत सुरु केल्याने बाहेरच्या तालुक्यातील व शहरातील लोक लसीकरण करुन घेत असल्यामुळे स्थानिक नागरिक लसीकरण पासुन वंचीत राहत आहे . पारशिवनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर चंन्द्रपुर , भंडारा , गोंदिया , आणि लगतच्या नागपुर शहर , ग्रामीण येथुन लोकांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केल्यामुळे व रोज लसीकरण सुरु झाल्यानंतर बाहेरुन येणार्या नागरिकांचे लसीकरण केले जाते . त्यामुळे पारशिवनी तालुक्यातील नागरिक लसीकरण पासुन वंचीत राहत असल्यामुळे नागरिकांन मध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या रोषाचे आणखी दुसरे मुख्य कारण म्हणजे आॅनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तेव्हाच schedule booking चा पर्याय येत नसुन तो कोणत्या ही वेळी त्याचा स्लाॅट ओपन होतो . ग्रामीण च्या नागरिकांना याबद्दल जागरुकता नसुन ते दिवसेन दिवस स्लाॅट बुकींग ची वाट बघत असतात अद्यापही त्यांच होत नाही . हीच परिस्थीती जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर असल्याने भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांनी जिल्हाधिकारी रविंन्द्र ठाकरे यांचा विनंती केली की प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर स्थानिक नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे व लोकांमध्ये होणारा संघर्ष टाळण्यात यावा अशी मागणी केली आहे .

*मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला ई.मेल , पुढील कार्यवाही सुरु*
भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेला ई.मेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असुन तो पुढील कार्यवाही साठी नगरविकास २ तसेच सा. आरोग्य विभागास पाठविण्यात आले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज