*मासोळ्यासाठी नदीकाठी लावलेल्या करंटने युवकाचा म्रुत्यु*
*मासोळ्याच्या नादात गेला युवकाचा जिव*
देवरी प्रतिनिधी – शैलेश राजनकर
देवरी :-तालुक्यातील ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भोयरटोला (शिलापुर) गावातील विलास जिवन वट्टी , वय:- ३८ वर्षे हा व्यक्ती नदी काठी मासोळ्या पकळ्यासाठी गेला. व असता त्या ठीकानी मासोळ्या पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या करंटने या युवकाचा म्रुत्यु झाला.

सविस्तर असे की, शिलापुर गावाला लागुन बाघनदीचा प्रवाह वाहत असतो. त्या परीसरातील गावातील काही लोक मासोळ्या पकळ्यान्याच्या उद्देशाने त्या नदिवर जात असतात. त्यातच म्रुत विलास वट्टी हा पण आज दि.१४ मे रोज शुक्रवारला सकाळच्या सुमारास(९.३० वा.) घरुन मच्छी पकडण्यास गेला असता दुपारी परत न आल्याने घरच्या लोकानीं त्याचा नदी परीसरात सोधा सोध केला असता. तो नदीच्या काठी म्रुत अवसस्थेत पडुन होता. त्याच्या अगांचा रगं काळा पडल्याने गावातीलच लोकानीं सांगीतलेकी काही लोकानीं वाघनदीवर मासोळ्या पकडण्यासाठी लावलेल्या करंटमुळेच म्रुत विलास वट्टी युवकाचा म्रुत्यु झालेला आहे.
या म्रुत युवाकाच्या परिवार पत्नी, मुलगा-मुलगी, लहान भाऊ , म्रुत युवकाची आई असुन या घटनेची नोदं देवरी पोलीस्टेसनला करण्यात आली आहे.
पोलिसानीं दिलेल्या माहीतीनुसार सदर म्रुत व्यक्तीला देवरी येथिल शव-विच्छदेनासाठी आनले आहे. या घटनेचा तपास देवरी पोलीस्टेसनचे थानेदार सिगंनजुडे याच्यां मार्गदर्शनात पोलिस नायक गायधने करीत आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज