Breaking News

*वाढंरा गावात रोजच्या वापरासह पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची दुरवर भटकंती* *वांढरा गावात लाखो रुपयाची आलेली नळ योजना फुस*

*वाढंरा गावात रोजच्या वापरासह पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची दुरवर भटकंती*

*वांढरा गावात लाखो रुपयाची आलेली नळ योजना फुस*

 देवरी प्रतिनिधी – शैलेश राजनकर
देवरी – तालुका टँकर मुक्त झाला असे तालुका प्रशासनाने
सांगितले असले तरी देवरी तालुक्याच्या वांढरा या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. चिचगड अप्पर तहसील कार्यालया अंतर्गत येत असलेल्या वांढरा गाव परिसरात टिपलेले हे मनभेदी छायाचित्र आहे. गेल्या वर्षी पाऊस पडूनही हिच परिस्थिती असेल तर तालुक्याच्या अनेक ग्रामीण भागातील लोकांचे कसे होणार…? सध्या संपूर्ण देशात लॉक डाऊन सदृश परिस्थिती आहे. त्या मुळे अनेक जण हाताला काम नसल्याने आपल्या गावात बसून आहेत त्याचबरोबर देवरी तालुक्याच्या बरेच ठिकाणी भीषण पाणीटंचाईचे संकट देखील आहे. यातच वाढंरा ग्रामपंचायत येथे पिण्याच्या पाण्याचा विषय बिकट बनला असुन महिलानां पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
नाईलाजाने कोरोना काळातही पाण्यासाठी महिलानां बाहेर पडावे लागते*

पिण्याचे पाणी आणण्यासाठी वांढरा गावातील महिलानां १-२ किलो मीटर प्रवास करावा लागतो. गुराना पाणी पाजावे लागते. डोक्यावरून हंडा भरून पाणी आणावे लागते. नाईलाजाने रान तुडवत जनावरांना चारा आणावा लागतो. लाकूडफाट्यासाठी जंगलात जावे लागते. रान शिवारात जाऊन काम करावे लागते. आज शेत वाचवले नाही तर उदया काय खाणार हा प्रश्न निर्माण होतो. कोरोनाची भीती ग्रामीण भागातील लोकांच्या मनात देखील आहे. परंतु त्याना पाण्यासाठी नाईलाजाने बाहेर पडावे लागत आहे. वांढरा ग्रामपंचायत अतंर्गत तीन टोले येत असुन वांढरा ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या ६ बोर मधुन ४ बोरवेल (हातपंप) सुुरु आहेत तर २ हातपंपातुन गढुळ पाणी वाहतो, गावालगत ऐक मोठी विहीर असली तरी त्या विहीरीतला पाणी आटल्याने संपुर्ण गढुंळ पाणी येत असल्याने वांढरा गावातील लोकानां गावातीलच निवडक एक-दोन लोकांच्या घरी असलेल्या बोरवर एका टोल्यावरुन दुसऱ्या टोल्यावरचे २ कीलोमीटरचे अंतर कापत पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

*वांढरा ग्रामपंचायतीतील लाखो रुपयाची जल स्वराज्य योजना फुस…*

ग्रामीण भागातील सगळ्यात मोठी समस्या पाण्याची पाहता शासनाने लाखो रुपयाची जल स्वराज्य योजना प्रत्येक ग्रामपंचायतीला दिले आहे. पंरतु देवरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये या योजना फक्त कागदापुरतेच मर्यादीत असल्याचे चित्र अधिकार्याच्यां व ग्रामपंचायतच्या खावटी प्रक्रीयेमुळे तालुक्यात पाहायला मीळत आहे. वांढरा ग्रामपंचायतला जल स्वराज्य योजने अंतर्गत चार वर्षा अगोदर अंदाजे १४ लक्ष रुपयाचा निधी देण्यात आलेला होता पण ती योजना राबविण्यात आली की नाही हेच वाढंरा गावातील लोकानां समजेनासी झाली आहे. त्यावरच याच जलस्वराज्य योजनेला दुरुस्ती करून म्हणुन दोन लक्ष रुपेही खर्च करण्यात आल्याचेही गावातीलच लोकांकडुन सांगण्यात येत असले तरी वांढरा गावतील लोकांच्या पाण्याच्या वाढत्या संकटामुळे जल-स्वराज्य योजना गावात की की कार्यालयीन कागजावरच हाच भ्रम सुरु झाला आहे.

*वांढरा ग्रामपंचायतचे पदाधीकारी घालतात गावातील लोकांसी वाद*

दर वर्षी होत असलेल्या पाण्याची समस्या घेऊन तक्रारी करण्याचा प्रयत्न गावातील लोक सतत करण्याचा प्रयत्न करतात पंरतु ग्रामंपचायतचे पदाधीकारी व गावातील काही पक्षाचे पदाधीकारी गावातीलच लोकांसी वाद घालुन धमकवीन्याचा प्रयत्न करत असल्याचेही वाढंरा गावतील लोकांचे बोलणे आहे. गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे संकट पाहता गावातीलच ज्या निवडक एक-दोन लोकांकडे पाण्याचा स्त्रोत आहे असे सुजन नागरीक कोरोनाकाळात लोकांची मदत करीत आहेत व संपुर्ण वाढंरा ग्रामपंचायत त्या पाण्यावरच निर्भर आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …