*जिल्हा प्रशासनाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश* *म्युकरमायकोसिस आणि लहान मुलांना होणारा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करा* *आदिवासी समाजातील लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करा*

*जिल्हा प्रशासनाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश*

*म्युकरमायकोसिस आणि लहान मुलांना होणारा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करा*

*आदिवासी समाजातील लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करा*

गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक आज व्हीसीद्वारे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. मात्र अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानुसार कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार असल्याने, जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यातील 10 तालुक्यांसाठी मंजूर केलेले 10 ऑक्सिजन जनरेशन प्लांट तातडीने पूर्ण करण्याची सूचना श्री शिंदे यांनी प्रशासनाला केली. त्यासोबतच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांशी दिवसातून 2 वेळा तरी संपर्क साधण्यासही सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कोरोना स्थितीविषयी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. ऑनलाइन बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी खास वॉर्ड तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. त्यासोबतच सध्या राज्यात वेगाने वाढत असलेल्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगासाठी लागणारी सारी सज्जता करण्याच्या सूचना श्री. शिंदे यांनी केल्या. या रोगात रुग्णांचा मृत्यूदर जास्त असल्याने जिल्ह्यात याचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्यास सांगितले. या रोगाची औषध महाग असल्याने त्यांचा पुरेसा साठा आधीच करून ठेवावा असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी याबाबत पाचशे इंजेक्शनची ऑर्डर दिल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील लसीकरणाची परिस्थिती जाणून घेताना या भागातील आदिवासी लोकांच्या मनात या लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याचे श्री. शिंदे यांना अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेऊन आदिवासीच्या मनातील ही भिती दूर करण्याचे प्रयत्न करा असंही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केलं.

*जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचा पालकमंत्री शिंदे यांच्याकडून आढावा*

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांना 3 महिन्यांचा रेशन पुरवठा करणे, सर्पदंश आणि विंचूदंश यावरील औषधांचा सर्व तालुक्यातील आरोग्य केंद्रात करून ठेवणे. जिल्ह्यातील गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी आणून ठेवणे अशी सर्व मान्सूनपूर्व कामे वेळीच पूर्ण करावीत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावा लागणारा औषधांचा पुरवठा येत्या 15 दिवसात करून ठेवावा आशा सूचना पालकमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत जिल्ह्या प्रशासनाला केल्या.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …