Breaking News

*धरमनगर येथे अवैद्य देशी व विदेशी दारू विकणार्या आरोपीला कन्हान पोलीसांनी पकडले.* *देशी दारू ७२ निप, व विदेशी दारु ४८ निप असा एकुण १६८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.*

*धरमनगर येथे अवैद्य देशी व विदेशी दारू विकणार्या आरोपीला कन्हान पोलीसांनी पकडले.*

*देशी दारू ७२ निप, व विदेशी दारु ४८ निप असा एकुण १६८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत धरमनगर कन्हान येथे एक इसम आपल्याच घरी दारु विक्री करण्याची गुप्त माहिती कन्हान पोलीसांना मिळाल्याने पोलीसांनी आरोपीच्या घरी धाड मारून दारु विक्री करतांना आढळुन आल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी जवळुन देशी दारू व विदेशी दारू सह एकुण १६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक.१५ मे २०२१ ला रात्री ९:०० ते ९:३० वाजता च्या सुमारास कन्हान पोलीसांना दारू विक्री ची गुप्त माहिती मिळाल्याने कन्हान पोलीसांनी धाड मारून एक आरोपी हा दारू विकतांना आढळुन आल्याने त्यांच्या घराची झडती मध्ये कंपाऊंड ला लागुन असलेल्या जिण्याचा खाली देशी दारू १८० एम एल च्या ७२ निपा व विदेशी दारू च्या १८० एम एल च्या ४८ निपा असा एकुण १६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे फिर्यादी कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते यांचे लेखी तक्रारीने एका आरोपी विरुद्ध अप क्रमांक १३९/२०२१ कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी ला सुचना पत्रावर सोडण्यात आले. सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक सुनिल अंबरते, साफौ. येशु जोसेफ, पोशि कृणाल पारधी, मंगेश सोनटक्के, सुधीर बोरपल्ले, मपोशि नालंदा पाटील सह आदीने यशस्विरित्या पार पाडली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …