*कन्हान पोलीसांनी जुनिकामठी येथे अवैद्य रेतीचोरी करणारा बोलोरो पिकअप सह एका आरोपी ला पकडले*
*कारवाई दरम्यान ४ लाख २ हजार रू चा मुद्देमाल जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जुनिकामठी येथे कन्हान पोलीसांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांनी सापाळा रचुन जुनिकामठी ग्राम पंचायत जवळ अवैध रेती चोरून नेतांना बोलोरो पिकअप वाहन पकडुन आरोपी चालकाला ताब्यात घेऊन त्याचा जवळुन बोलरो पिकअप वाहन व एक ब्रास रेती असा एकुण चार लाख दोन हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक .१७ मे २०२१ ला सकाळी ७:४५ ते ८:१५ वाजता दरम्यान कन्हान पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमी मिळाल्याने पोलीसांनी जुनिकामठी येथे सापळा रचुन एक बोलोरो पिकअप चारचाकी वाहन क्रमांक. एम.एच. ३५. ए जे ०१७७ ला पकडुन त्यातील रेती बाबद चालक / मालक सुदांशु धनपाल मेश्राम वय २३ वर्ष राहणार. जुनिकामठी यास विचारपुस केली असता त्याने कन्हान नदीच्या पात्रातुन जुनिकामठी घाटातुन रेती बिना राॅयल्टी चोरून आणल्याचे निष्पण झाल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन सरकार तर्फे फिर्यादी पोलीस शिपाई सुधीर चव्हाण यांचे तक्रारीवरून आरोपी सुदांशु धनपाल मेश्राम याचा ताब्यातील बोलोरो पिकअप चारचाकी वाहन किंमत ४ लाख रुपए व अर्धा ब्रॉस रेती किंमत २ हजार रूपए असा एकुण चार लाख दोन हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सुदांशु मेश्राम विरूध्द अपराध क्रमांक १४२/२०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई कन्हान पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन गुन्हे शाखा निरीक्षक श्री कदम साहेब, सफौ येशु जोसेफ, नापोशि कृणाल पारधी, राजेंन्द्र गौतम, राहुल रंगारी, पोशि संजय बदोरिया, सुधीर चव्हाण, मुकेश वाघाडे, सुशिल तट्टे, संदीप गेडाम सह आदि ने शिताफितीने ही कारवाई यशस्वि रित्या ने पार पाडली.
Maharashtra News Media सच की आवाज