*गोंडेगाव, घाटरोहना शिवारात अवैद्य कोळसा चोरीचा ट्रक सह एका आरोपीला पकडले*
*उपविभागीय पोलीस अधिकारी ची कारवाई दरम्यान नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि खुली कोळसा खदान च्या गोंडेगाव, घाटरोहना शिवारात उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हा पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांनी धाड मारून खुली खदानचा चोरी केलेला कोळसा ट्रक मध्ये भरून नेतांना ट्रक पकडुन आरोपी चालकाच्या ताब्यातील ट्रक व २० टन कोळसा सह नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक .१७ मे २०२१ ला दुपारी १:३० ते २ वाजता च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान साहेब हे आपल्या वाहन चालक शिपाई सह जिल्हा ग्रस्त पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमी दारा कडुन अशी माहिती मिळाली कि गोंडेगाव, घाटरोहना शिवारात एक ट्रक क्रमांक एम पी ०९ एच एच ६५२१ मध्ये वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा भरून घेऊन जात आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीसांनी घटनास्थळी सरकारी वाहनाने जावुन धाड मारली असता कोळसा भरणारे मजुर पळुन गेले असुन ट्रक चालकास पकडुन विचारपुस केली असता उमेश पानतावने यांचे सांगण्यावरून ट्रक भरून घेऊन जात आहे. ट्रक चालकाकडे कोणत्याही प्रकारची बिल्टी व गेट पास नसल्याने सदर कोळसा हा चोरीचा असल्याचे निष्पन झाल्याने एक ट्रक क्रमांक एम पी ०९ एच एच ६५२१ किंमत आठ लाख रूपए व दगडी कोळसा २० टन किंमत एक लाख रूपए असा एकुण नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन सरकारी फिर्यादी पोलीस शिपाई विक्की उमेश कोथरे पोलीस स्टेशन खापरखेडा यांचा तक्रारी वरुन आरोपी १) ट्रक चालक मुकेश कुमार छित्तरमल मेवाड वय ३७ वर्ष राहणार. शाजापुर मध्य प्रदेश, २) उमेश मारोती पानतावने वय ४६ वर्ष राहणार. कांन्द्री कन्हान यांचा विरूध्द अपराध क्रमांक १४१/२०२१ कलम ३७९, १०८ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून ट्रक व कोळसा असा एकुण नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कन्हान मा.श्री मुख्तार बागनान यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी, कन्हान पोलीस स्टेशन गुन्हे शाखा निरीक्षक श्री कदम, सफौ येशु जोसेफ, नापोशि कृणाल पारधी, राजेंन्द्र गौतम, राहुल रंगारी, संदीप गेडाम, पोशि संजय बदोरिया, सुधीर चव्हाण, मुकेश वाघाडे, सुशिल तट्टे, विक्की कोथरे आदि ने शिताफितीने सापळा रचुन ही कारवाई यशस्वि रित्याने पार पाडली.
Maharashtra News Media सच की आवाज