*चिचगड येथिल मुस्लिम कब्रस्तानात व हिंदु समस्यानभुमीत अत्यंविधीसाठी सोई-सुविधांचा अभाव*
*स्थानीक ग्रामपंचायत व जनप्रतिनीधींचे दुर्लक्ष*
देवरी प्रतिनिधी-शैलेश राजनकर
चिचगड:-मरणपावलेल्या व्यक्तीवर चांगल्या वातावरणात अंत्यसंस्कार व्हावेत अशी आप्तेष्ठांची अपेक्षा असते. मात्र अस्वच्छता, तुटलेले बेड, खुले परीसर,अत्यंविधी साठी लागनार्या पाण्याची अपुरी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था अशा अनेक समस्यांमुळे चिचगड येथिल शमस्यानभुमी व मुस्लीम कब्रस्तानाची दूरवस्था झाली आहे. यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कब्रस्तान साठी व स्मशानभूमीसाठी लाखो रुपये दरवर्षी खर्च केले जातात मात्र प्रत्यक्षात कब्रस्तान व स्मशानभूमीत योग्य ती विकासकामेच झाली नसल्याचे चिचगड जामा मस्जिदचे अध्यक्ष शेख अब्दुला यांचे म्हनने आहे. तर मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान मध्ये अत्यंविधीसाठी अती आवश्यक असलेल्या साध्या पाण्याचीही सोय ऊपलब्ध नसल्याने विकासकामासाठी स्थानीक ग्रामपंचायतला आलेला निधी गेला तरी कोठे असा प्रश्न चिचगड येथिल जामा मस्जिदचे अध्यक्ष शेख अब्दुला यानीं केला आहे.
*मुस्लिम समाजाला अत्यंविधीसाठी ऐक कीलोमीटर अतंरावरुन आनावा लागतो पाणी*
चिचगड गावातील कब्रिस्तानात कोनतीही सोई सुविधा शेकडो पर्षापासुन पुरविण्यात आली नाही. चिचगड येथिल कब्रस्तान १०० वर्ष जुने असुन स्थानीक ग्रामपंचाय व जनप्रतीनीधीनां सतत निवेदन देऊनही कोनतीही दखल घेतली गेली नाही. चिचगड गावावरुन मुस्लिम समाजाचे कब्रस्तान हे ऐक किलोमीट अंतरावर आहे व त्या ठीकानी मुस्लिमसमाजाच्या अत्यंविधीसाठी लागनार्या अतिआवश्यक पाण्याची व्यवस्थाही नसल्याने मुस्लिमसमाजाला अत्यंविधीसाठी सोबत पाणी घेऊनच जावे लागत असल्याचे चिचगडच्या जामा मस्जिदचे अध्यक्ष शेख अब्दुला यानीं सागीतले आहे.
*हिंदु समाजाच्या स्मशानभूमीत सर्वात मोठी समस्या जलाऊ लाकडाची*
चिचगड येथिल हींदु समाजाच्या लोकानां अत्यविधी साठी लाकडे मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चिचगड येथिल लोकानीं अत्यंविधीसाठी जलाऊ काळ्या ऊपलब्ध करुन देण्याची मागनी ग्रामपंचायत व संबधीत विभागासह जनप्रतीनीधी कडेही केली पंरतु आज पर्यंत कोनतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेसी नाही.
चिचगड येथिल हिंदु समाजाच्या स्मशानभूमीत लाकडे ठेवण्यासाठी शेड नसल्याने पावसाळ्यात लाकडे ओली होतात व अंत्यसंस्काराच्या वेळी लाकडे पेटत नाहीत. तसेच रॉकेलचाही पुरवठा होत नाही. स्मशानभूमीत टॉयलेट नाहीत त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या महिला व पुरुषांना उघड्यावर बसावे लागते. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच याठिकाणी पाण्याची गंभीर समस्या आहेत. स्मशानभूमीत एक लाइटची ही व्यवस्था नाही. त्यामुळे या ठिकाणी पुरेसा प्रकाश व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना अंधारात विधी उरकावा लागतो.
*या सामाजीक कार्यकर्त्यानीं केली होती मागनी*
विशेषता चिचगड गावातील कब्रस्तान येथे अंत्यविधीसाठी मुस्लिम बांधवाना लागनारा पाणी व हिंदु बांधवानां अत्यंविधीसाठी लागनार्या काळ्या ऊपलब्ध नसल्याने याची दखल चिचगडचे जामा मस्जिदचे अध्यक्ष शेख अब्दुला व अतिमंसस्कांरासाठी लागनार्या जलावु काळ्यांचा प्रश्न राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्ता आरती जांगळे यानीं अनेकदा निवेदना द्वारे केली पंरतु निवेदन देऊनही कोनतीही दखल स्थानीक ग्रामपंचायत व जनप्रतीनीधी न केल्या मुळे चिचगड गावातील लोकांकडुन नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी चिचगड येथिल कब्रस्तान व शमस्यानभुमीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे अशी मागणी चिचगड गावातील नागरिकांनी केली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज