Breaking News

*अवकाळी पावसामुळे मृग बहाराच्या फुटेवर मोठा परिणाम* *आंब्या बहारावर येणार बुरशी रोग ; खरीब हंगाची पुर्वीची शेती कामे खोळंबली*

*अवकाळी पावसामुळे मृग बहाराच्या फुटेवर मोठा परिणाम*

*आंब्या बहारावर येणार बुरशी रोग ; खरीब हंगाची पुर्वीची शेती कामे खोळंबली*

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

मोवाड :- शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रविवारला दुपारी २.३० सुमारास पावसाला सुरवात झाली पावसासह वादळी वारा सुटल्याचे गावातील काही वागतील झाडे खाली पडली तर शहरात काही ठिकाणी विद्युत तार तुटली होती. मोवाड येथील विद्युत महामंडळाच्या कर्पमचारी यांनी त्रंयाच रात्री विद्युत तारा जोडून शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत केला.
आलेल्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार असल्याचे चित्र समोर येत आहे. मृग बहाराची संत्री ची फुट व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी फुटीची पूर्व तयारी केली. पण मात्र रविवार पासून सुरू असलेल्या सतत च्या पावसाच्या थंडाव्या मुळे जमीनीला तडण पडणार नाही त्यामुळे शहरातील शेतकऱ्यांना मृग बहार फुटणार नाही यांची चिंता वाटू लागली आहे.
आंब्या बहाराची संत्री खुप कमी प्रमाणात आहे. त्यात येत असलेल्या अवकाळी पावसामुळे संत्र्यावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव येऊ शकतो त्यामुळे हाती असलेली संत्री पूर्णतःस जाईल काय अशी भिती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. वर्षभऱ्याच पिक असलेल आंब्या बहार जर शेतकऱ्यांच्या हाती जर आले नाही तर कुटूंबाचे उदरनिर्वाह करणे कठीण होणार आहे.


खरीप हंगामाची पूर्व तयारी करण्याऱ्या शेतकऱ्यांना आवकाळी पावसामूळे शेती कामे ठप्प पडली आहे. त्यामुळे २५ पासून लागणाऱ्या रोहणी नकत्रा अगोदर शेती कामे पूर्ण होत नसल्याने शेतकरी संकटात आला आहे. रविवार पासून जनू पावसाळ्यातील श्रावण शिरवे सारखा सतत पाऊस सूरू असल्याने पूर्णा शेतकऱ्याचे कंबरडे मोडणार का आसे संकटात बळीराजा आला आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …