Breaking News

*सावनेर विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेसयांच्या वतीने वाढत्या महागाई च्या विरोधात सावनेर तहसीलदार यांना निवेदन*

*सावनेर विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेसयांच्या वतीने वाढत्या महागाई च्या विरोधात सावनेर तहसीलदार यांना निवेदन*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

खापरखेडा : देशात पेट्रोलच्या किमतीझपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारनेआज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारतसरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमती ६०० रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमतजवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी ११८५ रुपयाला होता, तोआता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ चे पन्नास किलोंचे पोते ११७५ रुपयांचेहोते ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत.देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे केंद्रातील भाजप सरकारने केलेआहे. या परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे पक्षाचे प्रदेशअध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी शहर तालुका ते जिल्हा महसूल विभागालाराष्ट्रवादी कार्यकार्तांच्या वतीने वाढीव किमतीच्या निषेधार्थ आदोलन व निवेदनदेण्याचे आव्हाहन केले आहे लक्षात घेता  सावनेर विधानसभा अध्यक्ष किशोर चौधरी व जिल्हाउपाध्यक्ष अमर जैन यांच्या नेतृत्वात सावनेर तहसीलदार सतिश मासाड यांना निवेदनदेण्यात आले. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करूनभाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.देशभरातील इतर शेतकरी देखील मोठ्या संख्येने केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजआहेत तोडगा काढुन दर वाढ मागे घ्यावी अन्यथा मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेसव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस यांच्या वतीने तालुक्यतील शेतकर्यांना सोबत घेवूनतीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशांरा देण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हाउपाध्यक्ष नाना केने, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष कपिल वानखेडे , सावनेर शहरअध्यक्ष सुरेंद्र वानखेडे , खापरखेडा शहर अध्यक्ष रामु बसुले, विनोद गोडबोले,जितेंद्र पानतावणे, विनोद कोथरे, शुभम गणवीर आदि उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …