Breaking News

*युवा मित्र सामाजिक संस्थे व्दारे मोक्षधाम रंगरंगोटी करून स्वच्छ व सुंदर केले.* *भविष्यात सुध्दा संस्थे व्दारे सामाजिक व जनहित उपयोगी कार्य करण्याचा मानस व्यकत करु – अध्यक्ष मनोज लेकुरवाळे व सचिव सतीश घारड*

*युवा मित्र सामाजिक संस्थे व्दारे मोक्षधाम रंगरंगोटी करून स्वच्छ व सुंदर केले*

*भविष्यात सुध्दा संस्थे व्दारे सामाजिक व जनहित उपयोगी कार्य करण्याचा मानस व्यकत करु – अध्यक्ष मनोज लेकुरवाळे व सचिव सतीश घारड*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – टेकाडी येथील मोक्षधाम कडे दुर्लक्षतेने येथे अस्वच्छता व इतर समस्या असल्याने अंतिम संस्कार करतांना होणार्या त्रासाची युवा मित्र सामाजिक संस्था टेकाडी च्या युवकांनी दखल घेत मोक्षधाम परिसरात स्वच्छता व रंगरंगोटी सेवाभावी कार्य करून सुंदर करण्यात आले आहे.


“एक हात मानुसकिचा “ च्या दृष्टिने एक सामाजिक दायित्वाने प्रेरित युवा मित्र सामाजिक संस्था टेकाडी व्दारे मोक्षधाम टेकाडी येथे मागिल काही दिवस सतत स्वच्छ अभियान प्रत्यक्ष रित्या राबवुन साफ सफाई, रंगरंगोटी, भितीवर स्लोगन, वृक्षरोपन आणि पडलेले गड्डे माती भरून सवान करून मोक्षधाम ला सुंदर नन्दनवन करण्याचे काम संघटनेच्या युवकांनी स्वत: राबुन करण्यात आले आहे. या कामाचे सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत असुन या कार्याची दखल घेत स्थानिय जि.प.अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे यांनी लवकरच निधी उपलब्ध करून मोक्षधाम येथे सभा मंडप, बोरींग हाथ पंप आणि प्रकाश व्यवस्था करण्यात येईल असे आश्वस्त केले. युवा मित्र सामाजिक संघटन टेकाडी अध्यक्ष मनोज लेकुरवाळे व सचिव सतीश घारड यांनी भविष्यात सुध्दा संस्थे व्दारे सामाजिक व जनहित उपयोगी कार्य करण्याचा मानस व्यकत केला आहे .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …