*पाणी व प्राणवायु करिता आता तरी वृक्षारोपण आणि वृक्षा संवर्धन करूया* *मनुष्याला पाणी व प्राणवायु पुर्ण पणे नाही मिळाल्यास जिवन संपेल.*

*पाणी व प्राणवायु करिता आता तरी वृक्षारोपण आणि वृक्षा संवर्धन करूया*

*मनुष्याला पाणी व प्राणवायु पुर्ण पणे नाही मिळाल्यास जिवन संपेल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – वृक्ष पासुन निसर्गाचा समतोल राखण्याचे अंत्यत महत्त्वाचे काम होते, पाऊस जमिनीवर पाडुन पाण्याची पातळी जोपासण्यास मदत होते तसेच मनुष्याला जगण्याकरिता लागणारा प्राणवायु (ऑक्सिजन) वृक्षापासुनच मिळतो. आपणास पाणी व प्राणवायु एक दिवस ही न मिळाल्यास मनुष्य जगु शकत नाही. यामुळेच पाणी व प्राणवायु च्या मुलभुत गरजेपोटी वृक्ष तोडीवर त्वरित निर्बंध लावुन वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची आधुनिक युगात अति नितांत आवश्यक गरज निर्माण झाल्याने वृक्ष लावुन जगवु या.
दिवसेंदिवस वाढत्या लोक संख्येमुळे रस्ते, महामार्ग, कारखाने, मोठ मोठी घरे, बंगले व प्रकल्पा च्या निर्माण कामाकरिता मोठय़ा प्रमाणात वृक्ष तोड होत असुन पाऊस अनियमित झाला आहे. प्रकृतीचे संवर्ध न करणे आवश्यक आहे परंतु केवळ झाडे लावुन संवर्धन होत नाही. “झाडे लावा, झाडे जगवा.” हा मुलमंत्र जपला पाहीजे. एका दिवसात सामान्यत: माणुस ३ सिलिंडर भरतील इतका प्राणवायुचे (ऑक्सीजन ) श्वसन करतो. एका ऑक्सीजन सिलिंडरची किंमत ७०० रू आहे. म्हणजे एका दिवसात १ माणुस २१०० रूपयाचा प्राणवायु वापरतो. एका वर्षाला ७,६६,५०० रूपए तर सरासरी आयुष्य जर ६५ वर्ष धरले तर हा खर्च ५ कोटी येईल. हा प्राणवायु आपणास आजुबाजुला असलेल्या झाडा, वृक्षापासुन फुकट मिळत असतो. आणि आपण वृक्षाची कत्तल करित सुटलो आहोत. वृक्षतोडीच्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन होत नसल्याने सिमेंटचे जगंले वाढुन वृक्षाचे वने मोठया प्रमाणात कमी होत असल्याने निसर्गाचा समतोल बिघडल्याने वेळेवर पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नाही, तापमाणात वाढ, पाणी टंचाई, दुष्काळा सारखे संकट वाढत आहे, किंबहुना वाढले आहे. जमिनीच्या पाण्याची पातळी कमी होऊन शेतकऱ्याला तर संकटाचा सामना करावा लागत आहे. त्वरित गांभीर्याने या वृक्ष तोडीवर वेळीच नियंत्रण न केल्यास आणि वृक्षाची लागवड, जोपासना व संवर्धन न केल्यास पुढे येणार्या दिवसात सर्व लोकांना पाण्याच्या व प्राणवायु (ऑक्सि जन) च्या समस्येशी भयंकर सामना करावा लागणार आहे. याच वृक्ष व वन यांचे महत्व संत तुकाराम महाराजांनी चारसे वर्षापुर्वी त्यांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या अभंगाच्या माध्यमातुन सांगितले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावुन संवर्धनाची जवाबदारी स्विकारली पाहीजे. वृक्ष हे मनुष्याचे जिवन जगण्याचे प्रमुख साधन होत आहे. कारण मनुष्याला खायला अन्न मिळाले नाही तरी तो कित्येक दिवस जगु शकतो परंतु पाणी व प्राणवायु एक दिवसही न मिळाल्यास मनुष्य जगु शकत नाही. हेच अंतिम सत्य लक्षात घेत वृक्ष तोडीवर त्वरित निबंधक लावुन वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अंत्यत आवश्यक म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा ,आरोग्य व शिक्षण या पाच मुलभुत गरजा प्रमाणेच सहावी गरज आधुनिक युगात निर्माण झाली आहे. ही कोरोना महामारी संकटात रूग्णानां प्राणवायुची मोठ या प्रमाणात कमतरता भासुन कित्येक लोकांचा बळी गेला आहे. या अगोदर मनुष्याला लागणारा प्राणवायु निसर्गातुनच उपलब्ध होत होता परंतु मनुष्यास मुबलक प्रमाणात प्राणवायु (ऑक्सीजन) निर्माण करणार्या वृक्षाची मोठया प्रमाणात कत्तल (तोड) करून निसर्गातील पाणी, प्राणवायु कमी करण्यास कारणीभुत मनुष्यच ठरल्याने कृत्रिम आक्सीजन निर्माण करून सुध्दा कित्येक रूग्णांचा ऑक्सीजन च्या अभावामुळे जिवाचे बळी घेतले आहे. मनुष्याने, शासन प्रशासनाने आतातरी भावी संभावय धोका टाळण्याकरिता वृक्ष तोडीवर निंर्बधक क्रियाशिल उपाय योजना कागदोपत्री न राबविता प्रत्यक्ष अमलात आणुन मानवजाती च्या कल्याणार्थ पाणी व प्राणवायुची आवश्यक महत्वपुर्ण गरजेपोटी युध्दस्तरावर का होईना येणार्या पावसाळ यात मोठया प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याची नितांत गरज सामोर उभी टाकली असल्याने पाणी व प्राणवायु करिता आतातरी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची ध्येय, उदिष्ट साध्य करणे आधुनिक काळाती गरज आहे. वनसंपदा आणि नैसर्गिक साधन संपत्ती ही जीवसृष्टीला लाभलेली देणगी आहे. तेव्हा “वनश्री हीच धनश्री ! वृक्ष लावु घरोघरी !! “ हा ध्यास प्रत्येकाने घेऊन वृक्षरोपन व संवर्धन करूया !.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …