Breaking News

*नगर परिषद क्षेत्रात १ जुन पर्यंत लाॅकडाऊन वाढला* *कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना ने शहरात दवंडी फिरवुन नागरिकांना केले आव्हान*

*नगर परिषद क्षेत्रात १ जुन पर्यंत लाॅकडाऊन वाढला*

 

*कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना ने शहरात दवंडी फिरवुन नागरिकांना केले आव्हान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणुचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने प्रसार परिणामकारक रित्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासना द्वारे नगर परिषद क्षेत्रात ०१ जुन २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लाॅकडाऊन (अतिआवश्यक वैद्यकीय सेवा वळगुन) वाढवण्यात आल्याने जिल्हाधिकारी रविंन्द्र ठाकरे यांचा आदेशानुसार कन्हान – पिपरी नगरपरिषद क्षेत्रात लाॅकडाऊन वाढविण्यात आल्याने नप प्रशासना द्वारे शहरात दवंडी फिरवुन शासनाच्या नियमाचे काठेकोरपणे पालन करावे असे कडकडीचे आव्हाहन नगर परिषद प्रशासना ने नागरिकांना केले आहे .


राज्यात कोरोना विषाणुची साकळी तोडुन नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासना द्वारे संचारबंदी लागु करण्यात आली असुन ती पुढे सुरु ठेवणे अपरिहार्य असल्यामुळे राज्य शासना द्वारे नगर परिषद क्षेत्रात ०१ जुन २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लाॅकडाऊन (अतिआवश्यक वैद्यकीय सेवा वळगुन) वाढवण्यात आल्याने जिल्हाधिकारी रविंन्द्र ठाकरे यांचा आदेशानुसार कन्हान – पिपरी नगरपरिषद क्षेत्रात ०१ जुन पर्यंत लाॅकडाऊन वाढल्याने नगर परिषद प्रशासन ने शुक्रवार दिनांक १४ मे ला शहरात दवंडी फिरवुन सर्व किराणा दुकाने , भाजीपाला दुकाने , फळविक्रेते , दुध डेअरी , बेकर्या , सर्व प्रकारचे खाद्याने (चिकन , मटन , पोल्ट्री , मासे व अंडी ) शेती उत्पादनाशी संबंधित दुकाने , प्राण्यांचे अन्नपदार्थ विकणारी दुकानें , पावसाळी साहित्य विकणारी दुकानें सकाळी ७ ते ११ सुरु ठेवण्याचे आदेश लागु केले असुन सर्व दुकानांमधुन होम डिलेव्हरी मात्र सकाळी ७ ते रात्री ८ वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहे . विना कारण घरा बाहेर पडु नये , गर्दीत जाणे टाळावे , मास्क , सेनिटाइजर , व सोशल डिस्टेन्स चे पालन करुन कोरोना हद्यपार करण्यात करिता प्रशासनाला सहकार्य करावे . तसेच शासनाच्या आदेशांचे पालन न करणार्यांवर नागरिकांवर व आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ आणि भारतीय दंड संहिता चे कलम १८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येईल म्हणुन शासनाच्या नियमाचे काठेकोरपणे पालन करावे असे कडकडीचे आव्हाहन कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना ने नागरिकांना केले आहे .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …