*अतिक्रमित आलेला पांधन मार्ग मोकळा करुन कामाला सुरुवात*
*जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांच्या प्रयत्नाला मिळाले यश*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
मौदा – शेतकऱ्यांची दिवसेन दिवस अवस्था बिकट होत असून यावर्षी शेतकरी कोरोना प्रादुर्भावा मुळे मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पांधन मार्ग आज ही शेवट चा घटका मोजत आहेत शेतकऱ्यांच्या शेतातील पांधन मार्गा निधि मिळावा म्हणून मागील दोन वर्षापासून रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी जिल्हा खनिज निधि अंतर्गत २५ लाख रुपयांचा निधि तालुक्यातील निमखेड़ा ते शांतिनगर पांधन रस्ता दीढ किलोमीटर मंजूर केला होता. परंतु त्या पांधन मार्गाची पाहणी केली असता त्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते.अखेर हा मार्ग जिल्हा परिषद सदयस् कैलाश बरबटे यांनी अतिक्रमण हटवुन मार्गी लावला . त्यामुळे शेतकर्यांनी राहत मिळाल्याने आनंद व्यक्त केला .
मागील कित्येक वर्षा पासुन जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांनी सतत शेतकर्यांच्या बैठका घेऊन व शेतकार्यांशी चर्चा करुन पांधन मार्गा बद्दल आश्वाशन दिले होते. हे कार्य मागील दोन वर्षापासुन रखडल्याने मौदा येथील तहसीलदार व भूमापन अधिकारी यांना जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांनी पत्र देऊन चर्चा केली असता संबंधित अधिकार्यांनी या गंभीर विषया कडे दुर्लक्ष केल्याने वर्ष भरापासून तो पांधन मार्ग मोकळा करुन दिला नव्हता. परंतु निमखेडा येथील सरपंच भारतीय जनता पार्टीचे महामंत्री व येथील शेतकरी यांना विश्वासात घेऊन हा पांधन मार्गाच्या कामाला मंगळवार पासुन करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे , पंचायत समिति सदस्य न्यानेश्वर चौरे , सरपंच प्रमोद बरबटे , विनायक घाटबांधे , रवि चौव्हान , लीलाधर घाटबांधे , विनायक महादुले , सुरेश महादुले , गौरीशंकर तीरपूड़े ,आधीनाथ नानवटकर , कमलेश महादुले , प्रमोद जागड़े , विनोद बरबटे सह आदि नागरिक शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज