Breaking News

*खंडाळा येथे विज पडुन शेतकर्यांचा बैल ठार.* *शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी गावकर्यांची मागणी*

*खंडाळा येथे विज पडुन शेतकर्यांचा बैल ठार.*

*शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी गावकर्यांची मागणी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर*

कन्हान : – कन्हान परिसरात आलेल्या अवकाळी वादळ, वारा, पाऊस आल्याने खंडाळा (निलज) गावाला लागत असलेल्या कोठात विज पडुन बैल ठार झाल्याने खंडाळा (निलज) येथील शंकरराव वानखेडे या शेतकर्यां चे ऐन शेती कामाच्या वेळी भंयकर नुकसान झाले आहे.

मंगळवार दिनांक .१८ में २०२१ ला सायंकाळी ५ वाजता दरम्यान कन्हान परिसरात अचानक आलेल्या अवकाळी वादळ, वार्यासह पाऊस येऊन खंडाळा (निलज) येथील शेतकरी शंकरराव महादेव वानखेडे यांच्या गावाला लागत असलेल्या कोठावर विज पडुन कोठात बांधुन असलेल्या बैलजोडीतील एका बैलाचा मुत्यु झाला. शेतकरी सकाळी बैलाची देखरेख करण्यास गेले असता एक बैल निर्जिव दिसल्याने लोकांना बोलावुन विचारपुस केल्यावर विज पडुन बैलाचा मुत्यु झाल्याचे लक्षात येताच संबधित अधिकार्यांना माहीती दिली असता बुधवार दिनांक .१९ मे ला पशुवैद्यकीय अधिकारी वाळके मँडम व तलाठी क्षीरसागर यांनी घटनास्थळी येऊन उत्तरिय तपासणी व पंचनामा करण्यात आला.
खंडाळा (घटाटे) तालुका पारशिवनी येथील शेतकरी शंकरराव वानखेडे यांनी मागील वर्षीच ८० हजार रूपयांची बैलजोडी शेती कामाकरिता घेतली होती. परंतु शेतीची मसागत करून ऐन शेतीच्या महत्वाच्या कामाच्या सामोर अवकाळी पाऊसासह विज पडुन एक बैल ठार होऊन ४० हजार रूपयाचे नुकसान होऊ न त्वरित दुसरा बैल विकत घेतल्या शिवाय शेत काम न होता कुंटुबांच्या उदनिर्वाह चा प्रश्न उभा ठाकल्याने कोरोना महामारी संकट काळात म्हणजेच शेतकर्यां वर “दुष्काळात तेरा महिना ” सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामपंचायत खंडाळा उपसरपंच चेतन कुंभलकर, प्रेमदास धरमारे, मनोहर गावंडे सह गावकर्यांनी शेतकरी शंकरराव वानखेडे वर नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …