*खुर्सापार सीमेवर एसएसटी पथकाने ५ लाख रोकड जप्तीची कारवाई*

*संपादक -किशोर ढुंढेले सावनेर*
सावनेर : आज शनिवार रोजी सायंकाळी महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमा खुर्सापार चेकपोस्ट येथे विधानसभा निवडणुक आचार संहितेचे एसएसटी पथक तपासणी करित सायंकाळी ५.30 च्या दरम्यान वाहन क्रमांक MH-49-BB-9860*
*तपासली असता निळ्या रंगाच्या बॅग मध्ये नगद ५ लाख आढळुन आले.सदर वाहन हे बैतुल वरुन येत असुन तेजस पटेल व वरुण चौहान रा. नागपुर हे दोन व्यक्ती नागपुर ला येत असुन सदर वाहनामध्ये आढळलेली नगदी ५ लाख रुपये रक्कम प्रतिक निनावे बैतुल यांच्या कडुन हात उसने घेऊन नविन व्यवसाय सुरु करण्या करिता आणल्याची माहिती दिली.*
*जप्ती केलेली पाच लाख ही रक्कम पंचमाना करूण सावनेर तहसिल कोषागार येथे ठेवण्यात आली.*
*सदर कारवाही तहसिलदार दिपक करांडे, नायब तहसिलदार श्रीमती चैताली दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथक क्रंमाक ९ चे संजय सावरकर, दिलीप टेंभेकर,डांगोरे,राजेंद्र उबाळे ,पंकज बल्की, निशांत पोटवार यांच्या उपस्थितीत पर पडली.*
Maharashtra News Media सच की आवाज