Breaking News

*तरुणाचा खून 2 तासांत आरोपीला अटक; गोंदिया शहर पोलिसांची कारवाई*

*तरुणाचा खून 2 तासांत आरोपीला अटक; गोंदिया शहर पोलिसांची कारवाई*

गोंदिया : जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने लाठ्या-काठ्या, दगड-विटांनी जबर मारहाण करून एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना बुधवार, 5 मे रोजी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास गांधी वॉर्ड, जुना गोंदिया येथे घडली. यातील मृतकाचे नाव सुधीर रमेश सूर्यवंशी (वय 37) रा. गांधी वॉर्ड, जुना गोंदिया असे आहे, तर आरोपीचे नाव संतोष उर्फ पददू गोपाल बंसोड (वय 21) रा. गांधी वॉर्ड, जुना गोंदिया असे आहे. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून अवघ्या 2 तासांत आरोपीला अटक करण्यात यश मिळविले.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात तात्काळ सदर गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे हलवून गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी आरोपीचा शोध घेतला. दोन तासांच्या आत गुन्ह्यातील आरोपी संतोष उर्फ पददू गोपाल बंसोड यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. उद्या गुरुवार, 20 मे रोजी सदर आरोपीला न्यायालयात पोलीस कोठडी रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे. अटक आरोपीवर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहराचे ठाणेदार बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक भूजबळ, पोलीस उपनिरीक्षक मोरे, सहायक फौजदार थेर, पोलीस हवालदार सुजीत हलमारे, पोलीस नायक सुबोध बिसेन, ओमेश मेश्राम, संतोष बोपचे, प्रमोद चव्हाण, प्रकाश गायधणे, श्याम कोरे, संतोष भेंडरकर, पोलीस शिपाई छगन विठ्ठले, विकास वेदक यांनी केली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …