Breaking News

*” मिशन ब्रेक द चेन “या संचारबंदीच्या काळातही जनावरांची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय* *नागपुर-अमरावती रेंज चे पोलिस महानिरीक्षक या कडे लक्ष देतील काय?* *नागपुर-वर्धा-अमरावती च्या पोलीस अधिक्षकांनी हरियाणा-मध्यप्रदेश मार्गे येणारे कंटेनरांची कसून चौकशी चे निर्देश देण्याची गरज*

*” मिशन ब्रेक द चेन “या संचारबंदीच्या काळातही जनावरांची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय*

*नागपुर-अमरावती रेंज चे पोलिस महानिरीक्षक या कडे लक्ष देतील काय?*

*नागपुर-वर्धा-अमरावती च्या पोलीस अधिक्षकांनी हरियाणा-मध्यप्रदेश मार्गे येणारे कंटेनरांची कसून चौकशी चे निर्देश देण्याची गरज*

काटोल प्रतिनीधीनी- दुर्गाप्रसाद पांडे

काटोल – गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु हरियाणा-मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने नरखेड-काटोल-कोंढाळी मार्गे हैद्राबाद-अमरावती- औरंगाबाद कडे अवैध वाहतूक सुरू आहे.
गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु हरियाणा व मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने नरखेड-काटोल-कोंढाळी मार्गे अमरावती-बडनेरा-औरंगाबाद- तसेच हैद्राबाद कडे गोधना व म्हशी-रेडे यांची तस्करी केली जात आहे. मध्यप्रदेशांतून राज्याचे उपराजधानी नागपूर चे ग्रामिण भागातून जाणार्या महामार्गे हैदराबाद येथे वाहनात डांबून जनावरांची वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. तस्करांचा दबदबा असल्याने व संबधीत भागातील पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलीस हवालदारांचे मार्फत आर्थिक हित जोपासल्याने त्यांच्यावर थातुरमातुर कारवाई होत असल्याने तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कोरोना संक्रमण काळात महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. तर दुसरीकडे आंतरराज्यीय गोधन व पशुधन तस्कारीच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. मध्यप्रदेशातून गोधनाची चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशांतून लगतच्या तालुक्यातून अवैध वाहतूक सुरू आहे. या कडे नागपुर-वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांनी कडक निर्देश दिल्यास व हरियाणा मध्यप्रदेशांतून येणारे कंटेनरांची चोखपणे तपासनी केल्यास आंतरराज्यीय अवैध पशु वाहतूक तस्करी वर प्रतिबंध बसू शकतो.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …